NEET Paper Leak Case: सीबीआयला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये नीट पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे (NEET Paper Leak Case) मिळाले आहेत. त्यामुळे सीबीआयच्या म्हणण्यानूसार, यापुढील आरोपींना अटक झाल्यानंतर नीट पेपरलीक प्रकरण आणखी व्यापक वळण घेणार आहे. तसेच नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र म्हणून समोर आले असून या प्रकरणात हायप्रोफाईल पालक रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.
सीबीआयच्या तपासातून काही नातेवाईकांनी नीटचा पेपर पुढे इतर लोकांनाही विकला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप किती विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केला होता, हे सीबीआयला निश्चित करता आलेले नाही. यामुळेच पेपर किती लोकांपर्यंत पोहोचला, हे सध्या शोधणे कठीण झाले आहे. (NEET Paper Leak Case)
नीट पेपरलीकचे सर्वात मोठे केंद्र महाराष्ट्र- (NEET Paper Leak Case)
सीबीआयच्या तपासात आतापर्यंत समोर आले आहे की, नीट पेपरलीकचे सर्वात मोठे केंद्र महाराष्ट्र होते. याच ठिकाणाहून राजस्थान आणि इतर राज्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत ‘प्रश्नपत्रिका’ पोहोचवण्यात आली. पेपरलीक करणारे दलाल आणि सूत्रधारच नव्हे, तर मोठी रक्कम देऊन पेपर खरेदी करणारे हाय प्रोफाइल पालकही सीबीआयच्या रडारवर आहेत. एजन्सी आता अशा सर्व पालकांची यादी तयार करत आहे, ज्यांच्या बँक खात्यांतून शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी किंवा त्यांची सहकारी मनीषा वाघमारे (पुणे) यांच्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते. सीबीआयच्या तीन पथकांकडून आता पुढील चेन म्हणजे पेपर खरेदी करणारे नातेवाईक आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. सीबीआय लवकरच इतर राज्यांमध्येही छापेमारी करणार आहे.
लातूरमध्ये सीबीआयची कारवाई आणखी तीव्र, तिसऱ्या डॉक्टरची चौकशी सुरू- (NEET Paper Leak Case)
लातूर शहरात नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता आणखी वेग आला असून, सीबीआयचे पथक आता तिसऱ्या डॉक्टरांच्या चौकशीसाठी दाखल झाले आहे. जुना औसा रोड परिसरातील एका BAMS डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये सीबीआय अधिकारी पोहोचले असून, संबंधित डॉक्टरांची कागदपत्रे आणि संपर्कांची पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी लातूरमधील दोन डॉक्टरांची चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीनंतर तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता तिसऱ्या डॉक्टरांवरही संशयाची सुई फिरल्याने सीबीआयने थेट हॉस्पिटल गाठत तपास सुरू केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन अधिक गडद होत चालल्याचे चित्र असून, काही डॉक्टर, कोचिंग नेटवर्क आणि विद्यार्थ्यांमधील संपर्कांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सीबीआयकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी शहरात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ. मनोज शिरुरे यांचे नेटवर्क अंबाजोगाईपर्यंत? सीबीआयची चौकशी अधिक तीव्र (NEET Paper Leak Case)
नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांनी काही जणांना प्रश्नपत्रिका पुरवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयचे पथक तपासासाठी अंबाजोगाई आणि परभणी परिसरात पोहोचले होते. अंबाजोगाई येथे काही संशयित विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना पुढील तपासासाठी लातूर येथे आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणात डॉ. शिरुरे यांच्या संपर्कातील व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि परीक्षेपूर्वी झालेल्या हालचालींची सखोल चौकशी सुरू असल्याचे समजते. नीट पेपरफुटी प्रकरणातील तपास आता केवळ लातूरपुरता मर्यादित न राहता मराठवाड्यातील विविध शहरांपर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाची व्याप्ती अधिक मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा