सेकंड हँड कार घ्यायचीये? या आहेत देशातील बेस्ट SUV, सुरुवातीची किंमत 5 लाखांहून कमी  | ऑटो


Last Updated:

नवीन एसयूव्ही खरेदी करणं प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही. यामुळे अनेक लोक सेकंड हँड वाहनांकडे वळतात. तुम्हीही सेकंड हँड वाहन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल. तर आज आपण बेस्ट पाच गाड्यांची लिस्ट पाहणार आहोत.

सेकंड हँड कार मार्केट
सेकंड हँड कार मार्केट

Best Second-Hand SUVs in India: आपली स्वतःची कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रत्येकालाच नवी कोरी कार घेणं हे शक्य होत नाही. अशावेळी सेकंड हँड कार हा बेस्ट ऑप्शन ठरतो. नव्या गाड्यांच्या वाढत्या किंमती, मोठा वेटिंग पीरियड आणि पहिल्या वर्षात होणारा मोठं डेप्रिसिएशन एका समजदार ग्राहकाला सेकंड हँड मार्केटकडे वळवतो. अशावेळी लिमिटेड बजेट असणाऱ्यांसाठी एक विश्वसनीय सेकंड-हँड एसयूव्ही खरेदी करणं समजदारीचा निर्णय आहे. भारतीय बाजारात काही अशा एसयूव्ही आहेत. ज्या आपली मजबूत बनावट, टिकाऊ इंजिन आणि चांगल्या रीसेल व्हॅल्यूसाठी ओळखल्या जातात.

जुनी कार खरेदी करताना सर्वात मोठी चिंता मेंटेनेंस आणि विश्वसनियता असते. यामुळे ज्या गाड्यांचे स्पेयर पार्ट्स सहज मिळतील आणि ज्यांचं इंजिन लाखो किलोमीटर चालल्यानंतरही नव्यासारखा परफॉर्म करतो अशा गाड्यांची निवड करणँ गरजेचं ठरतं. रिसर्च आणि मार्केट व्हॅल्यूच्या आधारे आपण 5 विश्वासार्ह सेकंड-हँड एसयूव्हीची लिस्ट तयारी केली आहे. जी तुमच्या बजेटमध्ये बसू शकते.

Maruti Suzuki Brezza

तुम्हाला कमी मेंटेनेंस आणि शानदार मायलेज असणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही हवी असेल. तर जुनी ब्रेझा सर्वात सुरक्षित ऑप्शन ठरते. याचं जुनं 1.3-लिटर डीडीआयएस डिझेल इंजिन आणि नंतर आलेलं 1.5-लिटर पेट्रोल इंजिन, दोन्हीही आपल्या लाँग लाइफसाठी प्रसिद्ध आहेत. मारुतीचं मोठं सर्व्हिस नेटवर्क असल्यामुळे याचे पार्ट्स प्रत्येक शहरात खुप स्वस्तात मिळतात. मीडल क्लास कुटुंबासाठी ही आजही पहिली पसंत आहे. ती 4-5 लाखांत खरेदी केली जाऊ शकते.

Hyundai Creta

हुंडई क्रेटाने सेकंड-हँड मार्केटमध्ये आपलं मजबूत स्थान निर्माण केलंय. ही एसयूव्ही आपल्या स्मूथ इंजिन ऑप्शन्स (पेट्रोल आणि डिझेल), प्रीमियम केबिन आणि चांगल्या रीसेल व्हॅल्यूसाठी ओळखली जाते. 2018 ते 2021 दरम्यानच्या मॉडल्स सेकंड-हँड मार्केटमध्ये खुप प्रसिद्ध आहे. फीचर्सही बरेच आहेत आणि आरामदायक राइड क्वालिटीमुळे क्रेटावर डोळे झाकून विश्वास ठेवला जाऊ शकतो.

Mahindra XUV500

मोठं कुटुंब आणि लांबच्या प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी महिंद्रा एसयूव्ही 500 एक दमदार आणि परवडणारा ऑप्शन आहे. याचं 2.2-लिटर एमहॉक डिझेल इंजिन खुप शक्तिशाली आहे. जो खराब रस्त्यांवर सहज क्रूज करतं. खरंतर ही गाडी आता मिळत नाही. पण जुन्या गाड्यांच्या मार्केटमध्ये या गाडीची खुप मागणी आहे. कारण ही कमी किंमतीत शानदार रोड प्रेझेंस आणि 7-सीटरचं स्पेस देते.

Toyota Fortuner

विश्वसनियतेविषयी बोलायचं झाल्यास फॉर्च्यूनरचं नाव आधी येतं. टोयोटाचं हे बुलेटप्रूफ इंजिन 2-3 लाख किलोमीटर चालल्यानंतर कोणत्याही तक्रारीशिवाय चालतं. खरंतर सेकंड-हँड मार्केटमध्येही याची किंमत थोडी जास्त असते. पण याची रीसेल व्हॅल्यू आणि मजबुतीमुळे ही कार पैसा वसुल ठरते. रफ अँड टफ वापरासाठी ही कार बेस्ट आहे.

Tata Nexon

सेफ्टीला प्राधान्य देणाऱ्या खरेदीदारांसाठी टाटा नेक्सन सेकंड-हँड मार्केटमध्ये एक बेस्ट ठरते. ग्लोबल एनसीपीमधून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या या एसयूव्हीची मजबूत बिल्ड क्वालिटी याची सर्वात मोठी यूएसपी आहे. या कारच्या पेट्रोल आणि डिझेल खुप रिफाइंड आहे. याचं केबिन खुप व्हेंटिलेटेड आणि मोठं आहे. जे भारतीय रस्त्यांवरील खड्ड्यांचा आरामात सामना करू शकते.

मराठी बातम्या/ऑटो/

सेकंड हँड कार घ्यायचीये? या आहेत देशातील बेस्ट SUV, सुरुवातीची किंमत 5 लाखांहून कमी 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *