Ghabadkund Box Office Day 4: मराठी सिनेमा (Marathi Movie) ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) आणि ‘देऊळ बंद 2’नंतर (Deool Band 2) आता आणखी एक मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज झालाय. तसं पाहिलं तर, रिलीजपूर्वीच या सिनेमानं धुमाकूळ घातलेला. या फिल्ममध्ये मराठीतली तगडी स्टारकास्टही झळकली आहे. ‘घबाडकुंड’ (Ghabadkund) सिनेमातून कल्पनेच्या पलीकडचं एक वेगळंच ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फिल्ममध्ये संदीप पाठक (Sandeep Pathak), देवदत्त नागे (Devdatta Nage), शशांक शेंडे आणि प्राजक्ता हनमघर यांसारखी स्टारकास्ट झळकली आहे. अशातच आता फिल्म रिलीज झाली असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतेय.
‘घबाडकुंड’नं चौथ्या दिवशी किती कमावले? (Ghabadkund BO Day 4)
सॅकनिल्कच्या रिपोर्चनुसार, फिल्मनं चौथ्या दिवशी 49 लाखांची कमाई केलीय. फिल्मनं 42 लाखांची ओपनिंग केलेली. आता चौथ्या दिवशी फिल्मच्या कमाईत काहीशी वाढ झाली आहे आणि हे फिल्मसाठी पॉझिटिव्ह साइन आहे. ही फिल्म ‘तुंबाडची मंजुळा’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर टक्कर देतेय. ‘तुंबाडची मंजुळा’ बॉक्स ऑफिसवर सक्सेसफुल झालाय. या सिनेमानं पहिल्या दिवशी 42 लाखांचा गल्ला जमवलेला. तर, दुसऱ्या दिवशी 76 लाखांची कमाई केलेली. या सिनेमानं तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 1.25 कोटींचा आकडा गाठला आणि चौथ्या दिवशी फिल्मनं 49 लाखांची कमाई केली.
‘घबाडकुंड’ सिनेमानं आतापर्यंत 2.92 कोटींचं नेट कलेक्शन केलंय. ही फिल्म फक्त 6 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलीय. मेकर्सनी बजेटचा 48.6 टक्क्यांचा भाग रिकव्हर केलाय. पण, रिलीज झाल्यापासूनच फिल्मला मिळणारा रिस्पॉन्स पाहता, लवकरच बजेट रिकव्हर करण्याची अपेक्षा आहे.
‘घबाडकुंड’च्या नावावर होणार ‘हा’ रेकॉर्ड?
‘घबाडकुंड’ सिनेमा 2026 ची सर्वाधिक कमाई करणारी मराठी फिल्म आहे. फिल्मला केवळ 52 लाख रुपयांची गरज आहे. जर फिल्मनं हा आकडा गाठला तर, सहावी हाइएस्ट ग्रॉसिंग फिल्म ठरेल.
2026 मधील सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट
105.68 कोटी रुपयांच्या कमाईसह रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा यादीत अव्वल स्थानी आहे. 72.24 कोटी रुपयांच्या कमाईसह ‘देऊळ बंद 2’ दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर 28 कोटी रुपयांसह ‘क्रांतीज्योती विद्यालय’ तिसऱ्या स्थानावर आहे. 13.83 कोटी रुपयांच्या कमाईसह ‘तुंबडची मंजुळा’ चौथ्या स्थानावर आहे. 8.97 कोटी रुपयांच्या कमाईसह ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणतंय सासूबाई?’ पाचव्या क्रमांकावर आहे. 3.44 कोटी रुपयांसह ‘सुपर डुपर’ सहाव्या स्थानावर आहे आणि 2.92 कोटी रुपयांसह ‘घबाडकुंड’ सातव्या क्रमांकावर आहे. आता पुढच्या काही दिवसांत ‘घबाडकुंड’ साऱ्यांचा रेकॉर्ड मोडून पहिलं स्थान गाठणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष