पावसाळा आता सुरू झाला आहे, सगळीकडे वातावरणात गारवा आला आहे. पावसाळ्याचे दिवस म्हणजे, कारचालकांची अग्नीपरीक्षा असते. रस्त्यावर साचलेलं पाणी, खड्डे आणि मुसळधार पावसामध्ये गाडी चालवण्याासाठी चालकाचा कस लागतो. त्यातच कारची काच स्वस्छ ठेवण्यासाठी ड्रायव्हरची चांगलीच दमछाक होत असते. पण, तुम्हाला माहितीये का घरातलाा एक अर्धा बटाटा तुमच्या कारची काच ही स्वच्छ आणि साफ करू शकते?
