Shraddha Kapoor Eetha: प्रसूती कळा, नाळ ठेचली अन् त्याच जोमात मंचावर उभी राहिली, ‘ईठा’चा अंगावर काटा आणणारा टीझर; श्रद्धा कपूरसह कोण झळकणार?


Eetha Shraddha Kapoor: बऱ्याच प्रतिक्षेनंतर ‘ईठा’ (Eetha) सिनेमाचा    धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘ईठा’ (Shraddha Kapoor) सिनेमाचा टीझर लीक झाला होता.  दरम्यान, आज या सिनेमाचा बहुप्रतिक्षित टीझर (Teaser) रिलीज झाला आहे.  टीझर रिलीज करण्यापूर्वी  श्रद्धा कपूरने आपल्या चाहत्यांसोबत फर्स्ट लूक शेअर केला होता.  काही तासांनंतर तिनं टीझर रिलीज केला. हा सिनेमा तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांच्या जीवनावर आधारीत असून,   या सिनेमातून त्यांचं कलेप्रति असलेलं प्रेम आणि कार्य दाखवण्यात आलं आहे.  या सिनेमाचा टीझर काही मिनिटात व्हायरल  झाला असून, हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता चाहत्यांनी व्यक्त केली आहे. 

‘ईठा’ सिनेमाचा टीझर आहे तरी कसा? (Eetha Movie Teaser)

ईठा सिनेमाच्या टीझरमध्ये तमाशासाठी उभारलेला मंच दिसतो आहे. इतर कलाकार लावणी सादर करत आहेत.  प्रेक्षकवर्गातून एक व्यक्ती उठतो आणि, ‘ईठा कुठेय?  ईठाला बोलवा’, असं म्हणतो. तर, दुसरीकडे श्रद्धा कपूरला प्रसूती  वेदना होतात. ती मंचाच्या दुसऱ्या बाजूला ती मुलाला जन्म देते. लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतो. मुलाला जन्म दिल्यानंतर ईठा, ‘मी अशी जाऊ शकत नाही, तयारी करायला घ्या’, असं म्हणते. त्यानंतर एका व्यक्तीचा आवाज येतो आणि तो म्हणचो, ‘अरे, तू मरशील…’  त्यानंतर रंगमंचावर ईठाची एन्ट्री होते. 

‘पडून मेले तर लोक मला बेचारी म्हणतील पण जर मी नाचता नाचता मेले तर, आदर्श बनेन’, असं ईठा म्हणते. यानंतर श्रद्धा कपूरचे डान्स करतानाचे वेगवेगळे शॉट्स पाहायला मिळतात.  टीझर संपल्यानंतर शेवटी एक व्हॉइस ओव्हर ऐकायला मिळतो, ‘पान में पान चखना हो तो मीठा, तुफान को नाचते हुए देखना हो तो ईठा…’ या सिनेमातून श्रद्धा कपूरचे किलिंग एक्सप्रेशन पाहायला मिळत आहे. 

श्रद्धा कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘ईठा’ सिनेमाच्या टीझरला प्रेक्षक आणि नेटकऱ्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत  आहे.  नेटकऱ्यांनी या सिनेमाच्या टीझरला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.  ‘श्रद्धा कपूरचा अंदाज आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणवर भारी आहे’, अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे.   ‘ईठा’ या सिनेमात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार असून,  या व्यतिरिक्त रणदीप हुड्डा  लीड रोलमध्ये आहे. नाना पाटेकर  तसेच मोहम्मद जीशान अय्यूब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा सिनेमा  28 ऑगस्ट 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘राजा शिवाजी’ सिनेमाची सिंहगर्जना; थिएटरनंतर आता OTTवर धुमाकूळ घालणार, कधी अन् कुठे रिलीज होणार?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *