Sana Malik on Polygamy in Vidhan Sabha: देशातील मुस्लीम महिलांना त्यांच्या धर्मातील बहुपत्नीत्वाच्या प्रथेमुळे अन्याय सहन करावा लागत आहे, या भाजपने उपस्थित केलेल्या आक्षेपाला विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी इस्लाम धर्मातील बहुपत्नीत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. देशातील मुस्लीम महिलांना त्यांच्या धर्मातील बहुपत्नीत्वाच्या (Polygamy) प्रथेमुळे अन्याय सहन करावा लागत आहे, बहु विवाहाची पद्धत पाकिस्तानात (Pakistan) 1 टक्के आहे. या तीन महिलांची किंमत यांना कळणार आहे का ? बुरख्यातील (burkha) हिला सुरक्षित नसतील, तर काय उपयोग? युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आपलं राज्य सरकार कधी आणणार ? त्यासाठी खास टास्क फोर्स सरकार तयार करणार का ? असा सवाल देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला होता. यावर सना मलिक यांनी भाजप आमदारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. (Maharashtra Politics news)
देवयानी फरांदे यांनी मुस्लीम महिलांबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अशाप्रकारच्या अत्याचार मुस्लीम महिलांवरच होतो का? बहुपत्नीत्वाला मुस्लीम धर्मात मंजुरी आहे. पाकिस्तानने काही नवीन केलं नाही, पाकिस्तानने कुराणमध्ये जे सांगितलं आहे, त्याची अंमलबजावणी केली आहे. भारतामध्येही कुराणची अंमलबजावणी करावी, ही आमची मागणी आहे. तिहेरी तलाक ही तलाखची एक पद्धत आहे, तलाख ए हसन, तलाख अहसन हे दोन्ही आम्ही पाळतो. तलाख ए बिद्दत ही वेगळी संस्कृती आहे, त्याचा आमच्या धर्मात कुठेही उल्लेख नाही. तिहेरी तलाक रद्द करण्यात आला, कायदा आणण्यात आला, भारतात जे अस्तित्त्वात नव्हतं ते रद्द करण्यात आलं. त्याचा अवलंब होत असता, त्यावर कायदा झाला असता, त्याच्या विरोधात कोणी गेलं असतं, तर आम्ही त्याविरोधात आवाज उठवला असता. बहुपत्नीत्व फक्त मुस्लिमांमध्येच अस्तित्त्वात का, मुस्लीम पुरुषच अनेक महिलांशी लग्न करतात का? दुसऱ्या धर्मांमध्येही बहुपत्नीत्व आहे, फक्त मुस्लीम धर्मात बहुपत्नीत्वासाठी कायदा आहे, असे सना मलिक यांनी ठणकावून सांगितले. यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला. सना मलिक यांना भाजप आणि शिंदे सेनेच्या आमदारांनी जोरदार विरोध केला. हा देश संविधानावर चालतो कुराणावर नाही, असे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले. मात्र, अजितदादा गटाचे आमदार सना मलिक यांच्या बाजूने उभे राहिले. यामुळे महायुतीमधील अंतर्गत दुफळी समोर आली.
आणखी वाचा
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story