Bigg Boss fame Anushree Mane: अनुश्री मानेकडून चाहत्यांना गुडन्यूज; अवघ्या 25 व्या वर्षी स्वप्न पूर्ण केलं, बाबांच्या आठवणीत भावुक होत म्हणाली…


Bigg Boss fame Anushree Mane buys new Home: बिग बॉस फेम (Bigg Boss) अनुश्री माने (Anushree Mane) विविध कारणांमुळे चर्चेत असते.  अभिनेत्री बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमुळे चर्चेत आली होती.  अनुश्री सोशल मीडियातही प्रचंड सक्रीय असते. विविध व्हिडीओ (Viral Video) तयार करुन अभिनेत्री सोशल मीडियात शेअर करते.  तिच्या व्हिडीओंना चाहत्यांकडून  भरभरुन प्रतिसाद मिळतो.  दरम्यान, अभिनेत्रीनं चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे. अभिनेत्रीने नुकतंच आपल्या हक्काचं घर घेतलं आहे.  अनुश्रीने गृहप्रवेश केला असून, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, बिग बॉस फेम इन्फ्ल्युएंसरने घर नेमकं कुठे घेतलं?  याची  माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, अनुश्रीनं घर घेतल्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

अनुश्री मानेनं हक्काचं घर घेतलं (Anushree mane buys new home Shares Emotional Post)

मिळालेल्या माहितीनुसार, हक्काचं घर घेण्यापूर्वी  अनुश्री माने भाड्याच्या घरात राहत होती.  आज तिने कष्टाने नवे घर घेतले आहे. या नव्या घरात अभिनेत्रीने प्रवेश केला असून, या खास प्रसंगी तिचे बिग बॉसमधील मित्र परिवार उपस्थित होते. अभिनेत्रीने सोशल मीडियात  पोस्ट शेअर करुन घर घेतल्याचा आनंद व्यक्त केला आहे.  घराची वास्तूशांती करतानाचा फोटो अभिनेत्री शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘भाड्याच्या छोट्याशा खोलीतून सुरू झालेला प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. कितीतरी अपयश पचवले, परंतु, स्वप्नांवरचा विश्वास कधी उडालेला नाही’.

‘आज  स्वत:च्या घराची वास्तूशांती करत असताना, हवनाच्या ज्वाळांमध्ये मला माझा संपूर्ण प्रवास दिसला. हे घर केवळ  विटा किंवा सिमेंटचं नाहीये. हे माझ्या आईचे कष्ट आणि बाबांच्या आशीर्वादाचे स्वप्न आहे.   आज खरंच माझं मन भरुन आलं आहे. एकेकाळी डोक्यावर छप्पर असावं, असं स्वप्न पाहणारी मुलगी, स्वत:च्या घराची पूजा करत आहे. घरात देवाचं स्वागत करत आहे. बाबा, आज तुम्ही असता तर, जास्त तुम्हालाच आनंद झाला असता’, असं अभिनेत्रीने म्हटलं.

अनुश्री मानेनं घर घेतल्यानंतर तिच्या या आनंदात बिग बॉस फेम अनेक कलाकार उपस्थित होते.  अनुश्री मानेच्या नवीन घरात,   तन्वी कोलते,  रुचिता जामदार, विशाल कोटियन, रोशन भजनकर, प्रभू शेळके  आणि राधा पाटील आदी कलाकार उपस्थित होते.  वस्त्रवेद या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडीओत अनुश्री मानेचं सुंदर घर आणि बिग बॉसमधील कलाकार दिसत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बजेट सिनेमांमध्ये झळकला, पण पोटासाठी रिक्षा चालवतोय ‘हा’ मराठी अभिनेता; गेली 7 वर्षे रिक्षा चालवून कुटुंब चालवलं





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *