मुंबई हादरली! दवाखान्यात लहानशा आजारावर औषध घेण्यासाठी बहिणी गेल्या अन् तिथंच भयंकर घडलं | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Mumbai Shocking Incident : दवाखान्यात फक्त लहानशा आजारावर औषध घेण्यासाठी गेल्या मात्र घरी परतल्यानंतर महिलांसोबत धक्कादायक कृत्य झालं. हा सर्व प्रकार मुंबईच्या धारावी या परिसरातील आहे. सध्या या प्रकरणी पोलीस चौकशी होत असून गुन्हा दाखल झालेला आहे.

दवाखान्यात गेल्या अन् थेट नको त्या अवस्थेत घरी परतल्या
दवाखान्यात गेल्या अन् थेट नको त्या अवस्थेत घरी परतल्या

मुंबई : लहान-सहान आजार किंवा दु:खणे असल्यास प्रत्येकजण हा तातडीने दवाखान्यात धाव घेतो. जिथं रुग्णांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. पण याच गर्दीत क्वचित असा काही प्रकार घडतो की खेट पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागते. धारावीत नेमकं काय घडलं आहे पाहा.

घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील धारावी या भागात राहत असलेल्या मीना सोनवणे यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्या रविवारी त्यांच्या बहिणीसह 90 फीट या रोडवरील एका डॉक्टरांकडे औषध घेण्यासाठी गेलेल्या. पण दवाखान्यात त्या तिथं पोहचण्या आधीच गर्दी असल्याने त्या रांगेत उभ्या राहून आपल्या नंबरची वाट पाहत होत्या.

यावेळी तिथं एक महिला येते आणि आधी पासूनच उभ्या असलेल्या रुग्णांच्या रांगेतून पुढे जाऊन नंबर घेत बाकावर बसतात. या गोष्टीवरच मीना यांनी आक्षेप घेतला आणि त्या दोघींमध्ये वाद सुरु होतो. पण काही वेळात हा वाद अधिकच वाढतो आणि त्यांच्या थेट धक्काबुक्की होते.

महिलांच्या भांडणात पतीची एन्ट्री

रागात एकमेकींचे केस ओढणे, जमिनीवर ढकलणे आणि मारहाण असे प्रकार तिथं घडतात. याच दरम्यान संबंधित जी महिला पुढे जाऊन नंबर घेते त्या महिलेचा पती तिथं येतो आणि त्या दोन महिलांच्या वादात मधे पडतो. धक्कादायक म्हणजे तो व्यक्ती मीना यांना चपलेने मारहाणही करतो. घटनास्थळी असलेल्या अनेकांनी तो प्रकार शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तो पर्यंत परिस्थिती जास्तच बिघडली होती. या सर्व गोंधळात मीना यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ही तुटले आणि त्यांच्या बहिणीच्या हाताचे एक बोट फ्रॅक्चर झाले.

दवाखान्यात घडलेल्या या घटनेनंतर मीना सोनवणे यांनी धारावी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केलेली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आशिया सिद्धीकी (वय30) आणि तिचे पती इस्तीयाक (वय36) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/

मुंबई हादरली! दवाखान्यात लहानशा आजारावर औषध घेण्यासाठी बहिणी गेल्या अन् तिथंच भयंकर घडलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *