Maharashtra Monsoon News : मान्सूनने (Monsoon) 14 दिवसाच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुढे काहीशी प्रगती केली आहे. आज कोकणातील रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगड जिल्ह्याच्या अलिबागपर्यन्त तर मध्य महाराष्ट्रात सातारा सोलापूर जिल्हे ओलांडून पुणे जिल्ह्यात मावळ मुळशी पुणे पर्यंत पोहोचला आहे. तसेच दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा कर्जत जामखेडपर्यन्त आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याचा बराचसा भाग व्यापत मान्सूनने पुढे वाटचाल केली आहे. त्याचबरोबर मान्सूनच्या ह्याच अरबी समुद्रीय शाखेनेच तेलंगणा राज्यातून मान्सून दक्षिण विदर्भातील गडचिरोलीतील ‘ सिरोंचा ‘ तालुक्याच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन ठेपला असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
मान्सून मुंबईत कधी?
मान्सून पोहोचलेल्या वरील सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली नसली तरी मान्सूनचे वारे तिथपर्यंत पोहोचले आहेत. मान्सूनच्या पुढील आगमनासाठी वातावरण अनुकूल असुन येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पुढे झेपावेल, असे वाटते.
कशामुळं मान्सून पुढे सरकला?
पावसाळी हंगामात समुद्रसपाटी च्या पातळीत स्थिरावणारा हवेच्या कमी दाबाचा पुर्वो-पश्चिम आस काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. आज तो पंजाब हरियाणा ऐवजी राजस्थान बिहार उत्तरप्रदेश राज्यातून पास होत आहे. तसेच वायव्येकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. अरबी समुद्रात साडे तीन ते पावणेचार किमी. दरम्यान असणाऱ्या प्रत्यावर्ती वाऱ्याच्या प्रणाली विरळतेकडे गेली आहे. त्यामुळे मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळाली असून महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल झाली आहे.
सध्याची उष्णतेची लाट व रात्रीचा उकाडा?
आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे शुक्रवार दिनांक 26 जूनपर्यंत विदर्भात भाग बदलत उष्णतेची तीव्र लाट तसेच रात्रीच्या उकाडा जाणवेल, असी माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक मामिकराव खुळे यांनी दिली आहे.
राज्यात 8 जूनपासून एकाच जागी मान्सून स्थिर, दोन आठवड्यानंतर पुढे वाटचाल सुरु
राज्यात 8 जूनपासून एकाच जागी स्थिर असणाऱ्या मान्सूनने अखेर दोन आठवड्यानंतर, आज पुणे आणि रायगड मधील अलिबागपर्यंत वाटचाल केली आहे. तसेच मध्य अरबी समुद्र, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील उर्वरित भागांसह छत्तीसगड, ओडीशा, झारखंड आणि बिहारमधील काही भागातही मान्सून पुढे सरकला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. पुढील ४८ तासात मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागात मान्सून दाखल होण्यास हवामान स्थिती अनुकूल आहे, असेही हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story