…अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा


मुंबई : ठाकरेंच्या सहा खासदारांचा आज उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Shivsena) यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश झाला. यावेळी, एकनाथ शिंदेंनी सर्वच सहा खासदारांच्या कार्याचा कौतुक करत, सहा टायगर शिवसेनेत दाखल झाल्याचं म्हटलं. त्यानंतर, खासदारांनी माध्यमांशी संवाद न साधताच ते बाहेर पडले. मात्र, खासदार संजय दिना पाटील (Sanjay dina patil) यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली भूमिका मांडली. मी स्वत:हून उद्धव ठाकरेंकडे गेलो नव्हतो, मी आमदारकी, खासदारकी मागायला गेलो नव्हतो. मला उद्धव ठाकरेंनी स्वत:हून बोलवलं होतं, असे म्हणत आपल्या पक्षप्रवेशानंतर आक्रमक भूमिका मांडली. तसेच, झोडा मारा असं म्हणणाऱ्यांनाही इशारा दिला. कुणाच्या भडकवण्यावरुन बळी पडून कोणीही कोणतेही कृत्य करू नये, अन्यथा एखाद्याला दवाखान्यात, तर कुणाला स्मशानात जावं लागेल, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशाराही दिला. 

पक्षामध्ये आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतीही अडचण नाही. मात्र, काही लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत. मी त्यांच्यासोबत राहावं असं त्यांना वाटत नाही.  मी सर्वांच्या समोर जाऊन भेटतो. ते उभे राहिल्यास 10 लोक आहेत,  मी गेल्यास 100 लोक उभे राहतात. मला उद्धव ठाकरे यांनी स्वत: बोलावलं होतं, मी त्यांच्याकडे पक्षात घ्या म्हणून गेलो नव्हतो, मला आमदारकी, खासदारकी द्या म्हणून गेलो नव्हतो, असे संजय दिना पाटील यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली, यावेळी संजय राऊतांनी केलेल्या भाषणावरुन त्यांनी पलटवार देखील केला.

अन्यथा कुणाला दवाखान्यात जावं लागेल

“मला सुरक्षेची गरज नाही, सुरक्षा त्यांनाच द्या. जर कोणी त्यांच्यावर हल्ला केला तर त्याचा आरोप माझ्यावर येईल.” “मी तर पोलिसांसमोरच मला सुरक्षा देऊ नका असे सांगितले आहे. पोलिसांच्या उपस्थितीत कोणी कोणाला मारू शकत नाही. सुरक्षा नसेल तर त्यांना मी योग्य ते उत्तर तरी देऊ शकेन.”, असे संजय पाटील यांनी म्हटलं. तसेच, आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना आवाहन करत ते म्हणाले की, “माझे त्यांच्याशी  वैयक्तिक वैर नाही. पण, कोणाच्या भडकावण्याला बळी पडून कोणीही कुठलेही कृत्य करू नये, अन्यथा कुणाला रुग्णालयात जावे लागू शकतं, तर कुणाला स्मशानभूमीत.”, अशा शब्दात शिवसैनिकांना इशारा देखील देण्याता आला. 

उद्धव ठाकरेंनी अगोदरच मतदारसंघात यायला हवं होतं

उद्धव ठाकरे काल मतदारसंघात आले हेच जर अगोदर आले असते तर हा प्रॉब्लेम झाला नसता. मला ज्या व्यक्तीबरोबर प्रॉब्लेम होता त्याला बोलावलं असतं तर ही स्थिती झाली नसती. मी जर गेलो नसतो तर कोरम पूर्ण झाला नसता. मला बोलावून घेतलं असतं, हे झालं नसतं. मला ज्या व्यक्तीनं शिव्या दिल्या, त्याला माफी मागायला लावली असती तर हे झालंच नसतं, असा दावा संजय दिना पाटील यांनी केला

हेही वाचा

महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *