Revati Sule Amruta Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) (Sharad Pawar) गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सदानंद सुळे (Sadanand Sule) यांची लाडकी कन्या रेवती सुळे (Revati Sule) लग्नबंधनात (Marriage) अडकली आहे. तिनं उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानीसोबत लग्नगाठ बांधली. माहितीनुसार, सारंग हे उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. दोघांच्या लग्नात सुळे आणि पवार कुटुंबाने धमाल केली. दोघांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सुप्रिया सुळेंसह, जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अमृता फडणवीस गाणं गात असल्याचं दिसून येत आहे.
रेवती सुळे हिचा संगीत सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित राहून किंग खान शाहरुखने चारचांद लावले. शाहरुख खानने रेवती सुळे आणि सारंगसोबत आपली आयकॉनिक स्टेप केली. दरम्यान, आता अमृता फडणवीस यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी रेवती सुळेच्या संगीत कार्यक्रमात ‘आशिकी 2’ सिनेमातील प्रसिद्ध गाणं ‘तुम ही हो’ गायलं.
अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यांचे साँग अल्बम व्हायरल होतात. अलिकडेच त्यांचा रेवती सुळेच्या संगीत कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो, रेवती सुळेच्या संगीत कार्यक्रमात त्यांनी गाणं गायलं आहे. त्यांनी रोमँटिक गाणं ‘आशिकी 2’ सिनेमातील ‘तुम ही हो’ गायलं आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अमृता फडणवीसांचा गुलाबी लेहेंग्यातील सुंदर लूक (Amruta Fadnavis Pink Lehenga Look)
रेवती सुळेच्या लग्नात अमृता फडणवीस यांनी गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यावर त्यांनी सिंपल मेकअप लूक कॅरी केला होता. अमृता फडणवीस सिंपल नॅच्युरल मेकअप लूकमध्ये खूप सुंदर दिसत होत्या. त्यांनी या लेहेंगा लूकवर ओपन हेअर्स ठेवले होते. तसेच डायमंड नेकलेसमुळे त्यांचा लूक अधिक खुलून दिसत होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष