Astrology : सुखाचे दिवस येणार! ‘हे’ 159 दिवस ठरणार वरदान, 4 राशींच्या लोकांना होणार जबरदस्त फायदा; रिकामी तिजोरी भरणार | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)


Last Updated:

काही ग्रहांची हालचाल ही खूप महत्वाची मानली जाते. या ग्रहांची हालचाल काही राशींसाठी वरदान ठरते. येत्या काही दिवसात अशीच एक खगोलीय घटना घडणार आहे. ज्याचा शुभ परिणाम काही राशींवर होणार आहे.

News18
News18

Neptune Vakri : ज्योतिषशास्त्रानुसार, नेपच्युन ग्रह हा गूढता, अध्यात्म आणि अंतर्ज्ञानाचा कारक आहे. या वर्षी, वरुण 159 दिवसांसाठी वक्री होईल, ज्यामुळे सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे परिणाम होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, नेपच्युन मंगळवार, 7 जुलै 2026 रोजी दुपारी 4:22 वाजता वक्री होईल आणि 13 डिसेंबर 2026 पर्यंत याच स्थितीत राहील. यामुळे चार राशींच्या लोकांना लाभ मिळू शकतो. त्यांची संपत्ती वाढेल आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीमध्ये देखील या काळात वाढ झालेली पाहायला मिळेल.

मेष

मेष राशीसाठी, नेपच्यूनची वक्री चाल सकारात्मक परिणाम आणू शकते. या काळात आर्थिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेचा व्यक्तीला फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन स्रोत निर्माण होतील. व्यावसायिक क्षेत्रात तुमचे धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी, नेपच्यूनच्या वक्री चालीमुळे अनेक समस्या कमी होऊ शकतात. घरातील शुभ कार्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. सर्जनशीलता वाढेल, मानसिक समस्या कमी होतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि आर्थिक लाभ मिळू लागेल. कर्क राशीच्या लोकांना या काळात जबरदस्त फायदा होईल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी, नेपच्यूनच्या वक्री चालीमुळे लाभाचे मार्ग खुले होतील. तुमच्या बँक खात्यातील शिल्लक वाढेल आणि तुम्हाला जमीन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. मोठ्या व्यावसायिक नफ्यासाठी तयार रहा. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एका मोठ्या यशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही जुनी कर्जे फेडाल.

मीन

नेपच्यूनची वक्री चाल मीन राशीसाठी शुभ राहील. या राशीच्या लोकांना एका लांबच्या प्रवासाला निघण्याची संधी मिळू शकते. त्यांना एक वेगळी सामाजिक ओळख मिळेल आणि प्रमुख व्यक्तींशी संवाद साधता येईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि प्रलंबित निधी प्राप्त होईल. त्यांना नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी मिळू शकते.

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/

सुखाचे दिवस येणार! ‘हे’ 159 दिवस ठरणार वरदान, 4 राशींच्या लोकांना होणार जबरदस्त फायदा; रिकामी तिजोरी भरणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *