Vaibhav Sooryavanshi : धक्काबुक्की करणाऱ्या श्रीलंकन खेळाडूला वैभवचा करारा जवाब, मॅचनंतर बोलतीच केली बंद, VIDEO | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

या विजयानंतर वैभव सूर्यवंशीने धक्काबुक्की करणाऱ्या खेळाडूला करारा जवाब दिला आहे. यावेळी तो काय बोलला आहे? हे जाणून घेऊयात.

vaibhav sooryavanshi
vaibhav sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi News : दाम्बुलाच्या इंटरनेशनल स्टेडिअमवर टीम इंडियाने श्रीलंकन संघाचा 66 धावांनी पराभव करत ट्रायसीरीज जिंकली आहे. टीम इंडियाच्या या विजयात वैभव सूर्यवंशीचा मोलाचा वाटा आहे. कारण त्याने 29 बॉलमध्ये 94 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावरच टीम इंडियाने हा सामना जिंकला होता. या विजयानंतर वैभव सूर्यवंशीने धक्काबुक्की करणाऱ्या खेळाडूला करारा जवाब दिला आहे. यावेळी तो काय बोलला आहे? हे जाणून घेऊयात.

खरं तर पहिल्यांदा सामन्याच्या निकालाबद्दल जाणून घेऊयात. टीम इंडियाने दिलेल्या 377 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण अविष्का फरांडो 3 तक निरोशन डिकवाला 25 आणि नुवानिंदू फरनांडो 21 वर बाद झाला.हे तीन विकेट पार पडल्यानंतर श्रीलंकेचा डाव अडचणीत सापडला होता.

त्याच्यानंतर सदीरा समराविक्रमा आणि कॅप्टन सहन अराचिंगे मैदानात आले होते. यावेळी सदीराने 52 धावांची खेळी केली.त्याच्यानंतर रविंदु फरनांडो 19 वर बाद झाला. त्यानंतर कॅप्टन सहन अराचिंगे देखील 38 वर बाद झाला. श्रीलंकेच्या 6 विकेट पडल्यानंतर ते सामना लगेच हारतील असे वाटत होते.पण वानुजा सहन आणि वियासकांथने श्रीलंकेचा डाव सावरला होता. दोघांनी मिळून श्रीलंकेला विजयाशी आशा दाखवली होती. पण वियासकांथ 39 वर बाद होताच सगळा खेळ संपला. त्याच्यापाठोपाठ वानुजा सहन 62 वर बाद झाला.त्यानंतर शेवटचे काही खेळाडू जास्त काही करू शकले नाही त्यामुळे श्रीलंका टीम 311 वर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 66 धावांनी जिंकला होता.

टीम इंडियाकडून यश ठाकूर आणि विपराज निगमने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या होत्या.अनुकुल रॉयने 2,अशोक शर्मा आणि तिलक वर्माने एक विकेट घेतली होती.

class=”twitter-tweet” data-media-max-width=”560″>

“I’ve learned a lot, but I’ve played 50 overs a lot. People don’t seem to know. (laughs) Different conditions, different pitches, a little different to play, but it was fun and a good series.”

दरम्यान या विजयानंतर वैभव सूर्यवंशीने धक्काबुक्की करणाऱ्या खेळाडूला जबरदस्त सुनावलं आहे. खरं तर या सामन्याआधी वैभव सूर्यवंशीची श्रीलंकेच्या विशेन हलाम्बागेसोबत धक्काबुक्की झाली होती. या धक्काबुक्कीआधी विशेनने वैभवला घरी जा आणि हा आयपीएल सामना नाही, अशा शब्दात वैभवला आधी डिवचलं होतं. त्यानंतर धक्काबुक्कीचा राडा झाला होता.

त्याचं झालं असं विशेनला वाटलं की वैभव फक्त आयपीएल खेळणारा खेळाडू आहे,त्याला माहित नव्हतं की वैभवकडे वनडेचा अनुभव आहे.त्यामुळे जेव्हा सामन्यानंतरही त्याला विचारण्यात आलं की तुला वनडे सामन्यांचा अनुभव नाही,त्यामुळे या सीरीजमधून काय शिकलास? असे त्याला विचारण्यात आले होते. यावर तो म्हणतो,मला शिकायला खूप मिळालं आणि नंतर हसत पुढे तो म्हणाला, मी 50 ओव्हर्स खुप खेळलो आहे.पण खूप लोकांना वाटतं ते माहित नाही, अशा शब्दात वैभवने श्रीलंकन खेळाडूला एकप्रकारे जवाबच दिला.कारण धक्काबुक्की करणाऱ्या खेळाडूला तेच वाटले होते.त्यामुळे वैभवने हे उत्तर देऊन त्याची बोलती बंद केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *