मुंबई/धाराशिव: शिवसेना ठाकरे गटात ६ खासदारांच्या संभाव्य बंडामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा असून, त्यांनी १७ जून रोजी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेटही घेतली होती. हे खासदार शिंदे गटात विलीन होणार असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असली, तरी अद्याप कोणताही अधिकृत पक्षप्रवेश किंवा घोषणा झालेली नाही. या संपूर्ण ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) यांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याने राजकारणातील सस्पेन्स कमालीचा वाढला आहे. (MP Omraje Nimbalkar)
Operation Tiger UBT Shivsena: ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना फोन; ‘मातोश्री’वर जाणार?
पक्षफुटीच्या या सर्व चर्चांच्या दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून थेट संवाद झाल्याचे समजते. या संभाषणात ओमराजेंनी (MP Omraje Nimbalkar) , “मी अजूनही ठाकरे गटातच आहे,” असा शब्द ठाकरेंना दिल्याचे कळते. शनिवारी मध्यरात्री जेव्हा ठाकरे गटाचे पक्ष सचिव वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यात जाऊन ओमराजेंची भेट घेतली.
Operation Tiger UBT Shivsena: शिंदे गट हायअलर्टवर; मंत्री तानाजी सावंत धाराशिवकडे रवाना!
ओमराजे निंबाळकर यांची भूमिका ‘तळ्यात-मळ्यात’ असल्याचे लक्षात येताच शिवसेना शिंदे गट तातडीने अलर्ट झाला आहे. या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व करणारे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री तानाजी सावंत हे तात्काळ धाराशिवच्या दिशेने रवाना झाले आहेत. ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेण्याची जबाबदारी सावंत यांच्यावरच होती. दरम्यान, ओमराजे निंबाळकर आज सकाळीच पुण्यातून शेकडो कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह धाराशिवकडे निघाले आहेत. तिथे पोहोचल्यावर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपली पुढील अधिकृत भूमिका ठरवणार आहेत. दुसरीकडे, तानाजी सावंत हेदेखील धाराशिवच्या भूम-परंडा मतदारसंघात दाखल होत असून, ते धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Operation Tiger UBT Shivsena: इतर खासदारांची धाकधूक वाढली; संजय दीना पाटील यांच्याबाबतही चर्चा
ओमराजे निंबाळकर यांच्या या बदलत्या पवित्र्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’मध्ये सामील असलेल्या इतर ५ खासदारांची धाकधूक कमालीची वाढली आहे. हे संपूर्ण ऑपरेशन यशस्वी होणार की अपयशी, हे आता पूर्णपणे ओमराजेंच्या निर्णयावर अवलंबून आहे. या राजकीय नाट्याला आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे. या संभाव्य बंडात नाव असलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील यांनी आज अचानक ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता खासदार संजय दीना पाटील हेदेखील बंडाचा विचार सोडून ठाकरे गटातच राहणार का? अशा चर्चांना मुंबईच्या राजकारणात उधाण आले आहे.
Operation Tiger UBT Shivsena: उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातही फोनवरुन चर्चा
उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातही फोनवरुन बोलणे झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांची भूमिका जाणून घेतली. ओमराजे यांचे नेमकं म्हणणं काय आहे हे उद्धव ठाकरेंनी समजून घेतले. विशेष म्हणजे या फोन कॉलवर ओमराजे निंबाळकर यांनी आपण अजूनही ठाकरे गटासोबत असल्याचे उद्धव यांना सांगितले. आपणच मला मोठं केलं आहेय आज मी खासदार आहे, ते पक्षामुळे, तुमच्यामुळे. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी कार्यकर्त्यांसोबत सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहे. असे उद्धव ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?