Shani Sade Sati : ज्योतिष शास्त्रानुसार, 2027 हे एक महत्त्वाचं वर्ष मानलं जातं. कारण या कालावधीत शनि देव (Shani Dev) मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर, वृषभ राशीवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा म्हणजेच उदय काळ सुरु होणार आहे. या काळात आपल्या आयुष्यात थोडाफार बदल जाणवायला सुरुवात होते. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्र आणि शनिमध्ये मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे हा काळ फारसा कठीण नसणार आहे. मात्र, तरीही सावध राहणं गरजेचं आहे.
शनिच्या साडेसातीच्या काळात काय करावं?
धैर्य आणि शिस्त पाळा
हा काळ आत्मनियंत्रणाचा काळ मानला जातो. या काळात कोणताही मोठा निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.
आर्थिक योजना बनवा
या कालावधीत तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे तुमचं बजेट नियंत्रित ठेवा.
ज्येष्ठांचा आदर करा
साडेसातीच्या काळात घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर आणि सेवा करणं फार शुभकारक मानलं जातं. त्यांचा आशीर्वाद मिळाल्यास जीवनात स्थिरता येते.
मंत्र जाप तसेच पूजा करा
या कालावधीत नियमित रुपाने ‘ऊॅं शं शनैश्वराय नम:’ मंत्र जाप केल्यास मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
दान-पुण्य करा
गरजूंना मदत करणं, सेवा कार्यात सहभागी होणं ही कार्य शनि देवाला प्रसन्न करतात. हा एक फार साधा उपाय मानण्यात आला आहे.
साडेसातीच्या काळात काय करु नये?
अहंकारापासून दूर राहा
या काळात घमंडीपणा, तसेच, हट्ट केल्यास तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनम्र व्यवहार करा.
आव्हानात्मक निर्णय घेऊ नका
गुंतवणूक किंवा आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तसेच, शॉर्टकटचा पर्याय निवडू नका.
वादविवादापासून दूर राहा
कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा.
अनावश्यक प्रवास टाळा
या कालावधीत जो प्रवास किंवा यात्रेचा प्रवास गरजेची किंवा महत्त्वाची वाटत नसल्यास असा प्रवास करणं टाळा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mars Transit 2026 : सावधान! मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने वाढणार चिंता; 21 जूनपासून पुढचे 42 दिवस 6 राशी संकटांत, पदोपदी राहा सतर्क
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH