शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांविषयी मोठे विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, हे खासदार तांत्रिकदृष्ट्या आजही शिवसेनेत आहे. ओम बिर्ला यांच्याकडून कोणतेही अधिकृत निर्देश नाही. ज्या गटात जाणार आहे, असं सांगितलं जात आहे, त्या मिंधे गटाने चार पाच खासदार येणार हे विधान आलं नाही. शिवसेना सोडली असं या खासदारांनी जाहीर केलं नाही. ते व्हिपचं उल्लंघन करून बैठकीला हजर राहिले नाही. त्याबद्दल कारवाई सुरू आहे. हा तांत्रिक मुद्दा आहे. काही खासदार संपर्कात आहे. मतदारसंघात जायला त्यांना भीती वाटते. लोकांचा रोष आहे. खासदार म्हणतात आम्ही शिवसेनेत आहोत. काही गैरसमज होत आहे. अशा खासदारांशी चर्चा करणं स्वाभाविक आहे. ज्या क्षणी सांगतील शिवसेना सोडतील. तेव्हा संबंध तोडू. आज उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईत येऊन मेळावे घेणार आहे. त्यानंतर २७ ते २९ तारखेला या सर्व खासदारांच्या मतदारसंघात जाणार आहे. नागपूर यवतमाळपासून दौरा सुरू होईल. तो शिर्डीला संपणार आहे. मराठवाड्यात जाणार आहे. ही एक प्रक्रिया आहे. त्यात धाराशिव, हिंगोली, परभणी आहे. या सर्व मतदारसंघात जाणार आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.