Mars Transit 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या चालीचा आपल्या जीवनावर फार खोलवर परिणाम होतो. अशातच साहस, पराक्रम आणि ऊर्जेचा कारक मंगळ ग्रहाचं राशीत परिवर्तन ही एक फार महत्त्वाची खगोलीय घटना मानली जाते. आज म्हणजेच 21 जून 2026 रोजी मंगळ ग्रह आपली राशी बदलून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाचं हे संक्रमण 2 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे. याचाच अर्थ याचा प्रभाव थेट 42 दिवसांपर्यंत असणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने सर्व 12 राशींवर याचा परिणाम होणार आहे. हे संक्रमण काही राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
‘या’ राशींनी राहावं सतर्क
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं संक्रमण फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी ताळमेळ जुळवण्यात अनेक अडचणी येतील. या काळात अहंकार करु नका. तसेच, वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, कोणताही मोठा निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या.
तूळ रास (Libra Horoscope)
मंगळ ग्रहाचं संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी तणावाचं ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी अनेक वाद-विवाद होतील. याचा सामना तुम्हाला करावा लागेल. तसेच, घरातील वातावरणसुद्धा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा घरात विनाकारण वाद होऊ शकतात. विनाकारण पैसे खर्च करु नका. तसेच, कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबियांचं मत विचारात घेणं गरजेचं आहे त्यानंतरच निर्णय घ्या.
इतर चार राशी
ज्योतिष शास्त्रानुसार, या दोन राशींव्यतिरिक्त सिंह, मकर, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी देखील या काळात सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या आर्थिक स्थितीवर याचा परिणाम होऊ शकतो. या राशींच्या लोकांनी पैशांची गुंतवणूक, वैयक्तिक संबंध आणि आरोग्याच्या बाबतीत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Horoscope Today 21 June 2026 : आज शनिवारचा दिवस 8 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा आजचे राशीभविष्य
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH