Sharaddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या कुटुंबात दुरावा ? आई- भाऊ गोव्याला, तर वडील शक्ती कपूर.. – Marathi News | Shraddha Kapoor and Family: Separate Homes Spark Rift Rumors Amid Etha Biopic Hype


अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि कुटुंबीय

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘इठा’ (Etha) या आगामी बायोपिकद्वारे मोठ्या पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाली आहे. ‘कॉकटेल 2’ (Cocktail 2) सोबतच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तिच्या या छोट्याशा झलकने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असून, तो ऑगस्टमध्ये प्रदर्शित करण्याचे प्लानिंग केलं जात आहे. मात्र, सध्या श्रद्धा फक्त तिच्या कामामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे.

खरी गोष्ट श्रद्धाच्या कुटुंबाबत आहे. श्रद्धा कपूरच्या कुटुंबात चार लोकं आहेत आणि हे चारही लोकं वेगवेगळ्या घरात रहात असल्याची चर्चा आहे. यामागचं कारण काय ? जाणून घेऊया सविस्तर

पालकांपासून वेगळी राहते श्रद्धा

‘एफपीजे’ने (FPJ) सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, श्रद्धा कपूरचे कुटुंबीय तिच्यापासून वेगळे राहतात. ‘स्त्री 2’ (Stree 2) च्या यशानंतर श्रद्धाने हृतिक रोशनकडून जुहूमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला असून त्यामध्ये ती सध्या राहते. तिचा कथित प्रियकर राहुल मोदी तिथे तिची भेट घेत असल्याचेही वृत्त आहे. मात्र तिचे कुटुंबीय तिला क्वचितच भेटायला येतात.

खरंतर 2020 पर्यंत कपूर कुटुंबातील चौघेही सदस्य जुहू येथील एकाच अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत होते, परंतु कोव्हिडनंतर परिस्थितीत बदल झाला. आता, श्रद्धाचे वडील, शक्ती कपूर हे उपनगरातील एका फ्लॅटमध्ये स्वतंत्रपणे राहतात. तर श्रद्धाची आई, शिवांगी यांनी गोव्यात एक अपार्टमेंट विकत घेतलं असून कोव्हिडच्या सुरुवातीपासून त्या आपला बराचसा वेळ तिथे असलेल्या त्यांच्या प्रशस्त घरात घालवतात.

श्रद्धाचा मोठा भाऊ, सिद्धांत कपूर, याचेही गोव्यात एक घर आहे. जेव्हा त्याचं शूटिंग नसतं, तेव्हा तो तिथेच राहतो. थोडक्यात सांगायचं झालं चर तर, कपूर कुटुंबातील हे चौघेही सदस्य आता आपापल्या स्वतंत्र घरांमध्ये राहतात आणि त्यांचे जीवन स्वतंत्रपणे जगतात.

कुटुंबीय झाले वेगळे ?

रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर आणि तिचे वडील शक्ती यांनी गेल्या वर्षी जानेवारीत महालक्ष्मी रेसकोर्सच्या समोर एक अपार्टमेंट खरेदी केलं. या घराच्या इंटीरियर डेकोरेशनची जबाबदारी तिची आई शिवांगी सांभाळत आहे; त्यांना सौंदर्याची उत्तम जाण असून, आपल्या मुलीसाठी एक सुंदर घर साकारण्याची त्यांची इच्छा आहे. हे घर एकदा पूर्ण तयार झाल्यावर श्रद्धाचे सेंट्रल मुंबईत आणखी एक घर असेल. महालक्ष्मी येथील घराचा काही भाग तिच्या पालकांसाठी नेहमीच राखीव असतो, पण तिचा भाऊ सिद्धांतला त्याचं स्वातंत्र्य प्रिय असल्याने तो गोव्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या आपल्या घरातच राहणे पसंत करतो.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *