Pawanraje Nimbalkar Case Dharashiv: राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज देण्यात आला. तब्बल 20 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं दिला. निकाल वाचनाला माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या कुटुंबियांसोबत कोर्टात हजर होते. तब्बल 20 वर्षांनी खटल्याचा निकाल देण्यात आला. याप्रकरणात सीबीआय कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलीय.
पवनराजे हत्याकांड प्रकरणात माफीच्या साक्षीदाराची साक्षचं विश्वासार्ह नाही, या खटल्यात माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर शिक्षा देता येत नाही, हा धागा सरकारी पक्षासाठी महत्वाचा होता, मात्र वारंवार जबाब बदलल्यानं माफीच्या साक्षीदाराचा जबाब ग्राह्य धरता येत नाही, असं न्यायमूर्तींनी म्हटलंय. संशयाचा फायदा घेऊन सर्व आरोपींवर गुन्हा सिद्ध होत नाही म्हणून न्यायालय आरोपींना निर्दोष मुक्त करत आहे, असा महत्त्वाचा निकाल या प्रकरणात सीबीआय कोर्टानं दिलाय.
3 जून 2006 रोजी धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतील कळंबोली इथे गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे असलेला तपास नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांवर आरोप ठेवण्यात आलेत. त्यामुळे तब्बल 20 वर्षांनंतर लागणाऱ्या या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं. अशातच आज तब्बल 20 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल देण्यात आला. निकाल वाचन करताना या संपूर्ण प्रकरणाची भिस्त माफीच्या साक्षीदारावर असणार असल्याचं न्यायमूर्तींनी सांगितलं. तसेच, या संपूर्ण प्रकरणाचा पाया ठिसूळ असल्याचंही न्यायमूर्तींनी सांगितलंय.
कोर्टात काय-काय घडलं?
2006 पासून प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी सुरू झाली…
न्यायमूर्तींनी सर्वात आधी, दोन्ही बाजूंच्या वकिलांचे आभार मानले, त्यानंतर न्यायमूर्तींनी निकाल वाचनाला सुरुवात केली…
- या खटल्याच्या सुनावणीला काही कारणास्तव उशिर झाला
- 20 वर्षांनंतर मी निकाल देतोय.
- ही दुर्दैवी घटना आहे
- एका लोकनेत्याची अशा प्रकारे हत्या होते
- कळंबोली येथे गोळीबार करून हत्या झाली
- सुरुवातीला जो तपास झाला तो कळंबोली पोलिसांनी केला
- काही दिवसांनंतर नवी मुंबई गुन्हे शाखेकडे तपास होता
- त्यानंतर सीबीआयकडे तपास गेला
- दोषारोप पत्र येईपर्यंतचा तपास आहे त्यानंतर रायगड कोर्टात सुनावणी सुरू होती
- त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हा खटला या कोर्टात आला
- या प्रकरणात अनेक सरकारी वकील बदलले
- आरोपींचे जाब जबाब झाले होते
- अंतिम सुनावणी वेळी आता या अधिकाऱ्यांकडे हा तपास आल्याने उशिर झाला
- न्यायालय कायद्याच्या चौकटीत राहून हा निकाल दिला जातोय
- 127 साक्षीदार झाले
- यातील एक आरोपी माफीचा साक्षीदार म्हणून पुढे आला आणि पुन्हा सुनावणीला सुरूवात झाली
- हा खटला माफीचा साक्षीदार यांच्या साक्षीवर आधारित आहे
- या साक्षीपुराव्यामध्ये ओमराजे निंबाळकर राणा देवी आणि उस्मानाबादमधील काही लोकं
- साखर कारखान्यातील सहकारी आणि अन्य दोन नातेवाईक
- 2002 नंतर पवनराजे आणि पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली होती
- निवडणुकीत पवनराजे पराभव झाल्यानंतर राजकिय हेतूतून व पूर्ववैम्न्यसातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर येत होते.
- राजकीय वैमन्यसातूनही हत्या झाल्याचे समोर आले
- पवनराजे यांनी 2003 मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र लिहिले होते
- या खटल्याची पूर्ण भिस्त ही माफीच्या साक्षीदारावर उभी आहे
- न्याय निवाडा करताना अनेक मागील घटनांची उदाहरणंही दिलेली आहे
- माफीच्या साक्षीदाराचा पुरावा विश्वासात घेण्यापलिकडे तपासात ज्या बाबी समोर येतील त्याचाही विचार व्हावा…
- हा माफीचा साक्षीदार का झाला त्याला अटक कशी झाली? कोणत्या परिस्थितीत त्याने कबुली जबाब दिले… या गोष्टीचाही विचार केला गेला
- या प्रकरणात जैन यांच्या मनन्यानुसार गुन्हे शाखेने मुंब्रातून ताब्यात घेतले, मात्र त्याला अटक केली नाही… गुन्हे शाखेने पुढे त्याच्यावर 3 गुन्हे दाखवले, त्याची पोलिस कस्टडी घेतली… त्यात त्याला मारहाण केली औषध बंद केली, मग आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली… न्यायालयात ही त्याने हिच साक्ष दिली,,15 दिवस त्याला मारहाण केली जाते, मग कबूलीजबाब घेतला जातो… हे अयोग्य आहे…
- पारसमल जैन माफीचा साक्षीदार…
- सीबीआय कार्यालयाला हे पत्र मिळालं मात्र ते पत्र कोणी दिलं हे सांगत नाही
- संबंधित अधिकारी यांनी ते पत्र साईडला घेतलं
- ही साधी सुधा तक्रार नव्हती एका मोठ्या गुन्ह्याचा भाग होता
- हे पत्र पाहिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने कान उभे रहायला पाहिजे होते
- काही दिवसांनी अधिकाऱ्यांना जाग आली आणि क्लार्कला ते पत्र शोधण्यास सांगितलं, मात्र हे मूळ पत्र आलं कुठून याबाबत काहीही नाही…
- साक्षीदार फितुर झालेला आहे
- हे पत्र पुराव्यात पुरक म्हणून घेता येत नाही, त्यावरील हस्ताक्षर सही बरोबर आहे, मात्र माफीचा साक्षीदार कधी खर बोलतो कधी खोटं बोलतो, माफीचा साक्षीदार चा पहिला जबाब झाला तो कायद्याला धरून नव्हता…
- सरकारी पक्षाचीही जबाबदारी होती न्यायालयाला सांगितले पाहिजे होते हा जबाब महत्वाचा आहे पण ते केलं नाही, यामुळे एक मोठी घोड चूक झालेली आहे, यामुळे घोड चुकीमुळे हा पुरावा हुकला आणि त्याला संशयाच्या खाईत ढकलले…
- कबुलीजबाबात आरोपीची व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे, हा जबाब घेते वेळी प्रश्न इंग्रजीत घेतले, मात्र जबाबदार स्वाक्षरी घेतली नाही… जबाब झाल्यानंतर दाखले 2 घ्यायचे असतात… हे दाखले जबाबाच्या आदी दाखवलेले आहे…
- हे हेच दर्शवतं अधिकाऱ्यांनी दुसरा कबुली जबाब देताना साक्षीदाराने पहिल्या जबाबापेक्षा अधिक माहिती दिली, दोन्ही जबाबात तफावत आहेत… बारकाईने एक एक गोष्ट पाहिली तर पुरावे दाखवण्यासाठी हे मुद्दे जोडले गेलेले दिसून येते…
- माफीच्या साक्षीदाराबाबत घडलेला हा प्रकार पाहता छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने पाहणं आवश्यक आहे…
- माफीच्या साक्षीदाराचा मधला जो काळ आहे हा तपासणं गरजेचं आहे…
- आधी कबूलीजबाब दिला नंतर तो नाकारला, यानंतर विविध अर्ज आहेत…
- यात विशेष करून माफीचा साक्षीदार सांगतोय त्याला या थोड्याच गुन्हात अडवले मारहाण केली जीवे मारण्याची धमकी दिली औषधं बंद केली कुटुंबाला मारण्याची धमकी दिली आणि जबाब नोंदवला…
- घटनेच्या दिवशी तो तिथे नव्हता दुसरीकडे होता
- यासाठी नातेवाईक यांनीही तो राज्याबाहेर होता असे जबाब दिले
- एकूणच हा माफीचा साक्षीदार त्याची बदलणारी वेळोवेळीची साक्ष ही संशयास्पद आहे…
- पुढे या प्रकरणातील इतर आरोपी जामिनावर बाहेर होते
- मात्र माफीचा साक्षीदार आत होता त्यावेळी त्याने लिहिलेल्या अर्जात इतर आरोपी जामीनावर आहे मात्र मी अटकेत आहे
- माफीच्या साक्षीदार खोटं बोलत आहे वेळोवेळी साक्ष बदलतो
- साक्षीदाराचं म्हणणं आहे की त्याला आजार झाला होता पैशाची गरज होती
- मग तो इतर आरोपी्ना भेटला दुसऱ्या आरोपींनी त्याला कुछ पाने के लिए कुछ खोटा पडता है असे म्हटले
- साक्षीदाराचे मुंबई नवी मुंबई मिराभाई्दर येथे अनेक घरं आहेत दुकानं आहे, मिठाई दागदागिने यांची दुकाने आहे… साडेचार किलो सोन्याचं भांडवल त्यांच्याकडे आहे…
- त्यांचा कुठलाही उद्योग डबघाईला आलेला नव्हता… अशात त्याला 50 हजार रुपयांची गरज होती, म्हणून त्यानं हे केलं हे न पटणारं आहे…
- मातीच्या साक्षीदाराचा हा जबाब पाहता त्याच्या साक्षीने टिकून राहणं पूरक नाही, या प्रकरणाचा तपास करताना कुठल्याही आरोपीचा मोबाइल फोन जप्त केलेले नाही…
- सीडीआर काढलेले नाही अटक करते वेळी आरोपींचेया खिशात काय सापडले याची नोंद नाही…
- घरझडती घेतली मात्र काही सापडले नाही, मात्र मोबाइल जप्त करणे गरजेचे होते… त्यातून अनेक माहिती समोर आली असती… मात्र आदीही नाही नंतरही नाही… मात्र त्यावेळी सीडीआर उपलब्ध नव्हते असे सरकारी पक्षानं स्पष्ट केलं… मात्र तेव्हा नाही त्यानंतर तरी दोन्ही आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते का हे दर्शवता आलं असतं…
- माफीच्या साक्षीदाराने आपल्या जबाबात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत मात्र त्याला आधार नाही, तो ज्या इंद्रपूर इथे रहात होता त्याबाबतीत कुठलाही पुरावा नाही…
- आनंदीदेवी यांनी माफीच्या साक्षीदाराला घराच्या आजूबाजूला फिरत असल्याचं जबाबात आलं आहे, मात्र पहिल्या जबाबात हे नव्हतं…
- माफीचा साक्षीदार यानं आरोपीकडून दोन वेळा दीड लाख आणि एकदा अडीच लाख घेतल्याचं सांगितलं, मात्र नंतर परत आपली विधानं बदलतो…
हे पैसे माफीच्या साक्षीदाराने शूटरला 20 लाखांकडे अडीच लाख दिले, मात्र त्यातही तो साक्ष बदलतो… - बिहारमधून आपण या घटनेसाठी बंदुका घेतल्या, तिथून सिवानला जातो मग युपीला येतो, मात्र याबाबत कसलीही नोंद किंवा तिकिटं नाहीत…
- या साक्षीदाराची साक्षही गृहीत धरण्याजोगी नाही…
- या व्यतिरिक्त एक पुरावा आहे, पेपर देण्यापूर्वी किंवा नंतर साक्षीदार हा राकेश मारिया यांना भेटला
- माफीच्या साक्षीदाराचं एकदा नाही तर दहा वेळा म्हटलं आहे की, मारिया यांच्या सांगण्यावरून त्याला अटक झाली, मग मारिया यांचा जबाब नोंदवाल का गेला नाही? अशा परिस्थितीत हा पुरावा अभ्यासला गेला…
- माफीचा साक्षीदार म्हणतो की, तो आरोपी पद्मसिंह पाटील यांना मलबार हिल येथे बंगल्यात भेटला, मात्र पद्मसिंह पाटील यांचा बंगला तिथे नव्हताच, पद्मसिंह पाटील यांचा फ्लॅट कुलाबा इथे होता…
- साक्षीदार हा ठाण्याचा राहणारा आहे, मोठा व्यापारी आहे…
- पोलिसांचा खबरी आहे, मग त्याला मुंबईची माहिती नाही, हे गृहीत धरणं चुकीचं आहे… पहिला जबाब खरा वाटतो, दुसरा खोटा वाटतो, दोन्ही वाचले की तफावत वाटते…
- मारिया यांना भेटून स्काॅचची बाटली दिली असे म्हटले, मात्र मारिया यांनी हे आरोप खोडून काढले, मारिया यांना भेटल्यावर नोंद नाही…
- माफीच्या साक्षीदारावर तपास अधिकारी हा गुन्हा पुढे तपासत असेल तर मारिया यांचा जबाब आदी घेतला नाही नंतर घेतला का? मारिया यांना प्रश्न का विचारले नाही…
- नागपूरला माफीचा साक्षीदार तीन वेळा गेला, तिन्ही फेऱ्यांबाबत जबाबात वेगवेगळी माहिती दिलीय…
- मातीच्या साक्षी दार याने पिंटू सिंग नावाच्या शूटरला हायर केले
- त्यानंतर दोघे कुठे तरी गेले या दोन्हीबाबत कुठेही मॅच होत नाही
- प्रत्येक वेळी आरोपी इंद्रप्रस्थ येथे वास्तव्यास होता
- पैसे मिळाल्यानंतर गाडी घेतली चालक ठेवला
- चालकाचा जबाब नोंदवला त्यात गाडी घेताना चालक सोबत होता
- दोघे गाडीने ठाण्याहून लातूरला गेले तिथून शिर्डीला गेले दर्शन घेतलं
- आता साक्षीदारांने दिलेला जबाब चालकाचा जबाब यात तफावत आहे…
- एकूणच माफीच्या साक्षीदाराचे बदलते जबाब पाहता, त्यानंतर आम्ही फक्त शेवटचा जबाब ग्राह्य धरावा असे जर का सरकारी पक्षाचे म्हणणे असेल तर ते योग्य ठरणार नाही…
- गाडी कितीला घेतली यातही तिघांमध्ये तफावत आहे…
- या सगळ्या गोष्टी पाहता माफीच्या साक्षीदाराला खोटं बोलण्याची सवय आहे किंवा सोईनुसार तो साक्ष बदलत असल्याचे निदर्शनास येते…
- जी गाडी घेतली त्याच्या किंमतीतही तफावत आहे, घटनेनंतर गाडी ही एका छोट्याशा घराच्या बाजूला लावली… दुसरा सांगतो बंगल्याच्या बाजूला लावली…, मात्र पोलिस तपासानुसार गाडी मोकळ्या जागेत सापडली…
- गावाकडे दोन साक्षीदार जे तपासले तेही सांगतात गाडी मोकळ्या जागेत सापडली
- गाडीचा रंग एकाही साक्षीदाराला आठवत नाही, गाडी जळून खाक झाली होती
- जप्ती पंचनाम्यात गाडी हिरव्या रंगाची म्हटले आहे
- गाडी जळून खाक होती तर रंग कसा तपासला, तर गाडीचे कागदपत्र पाहून ते रंग लिहिले
- गाडीचे आधीचे फोटो पाहिले, मात्र ते सिद्ध झालेले नाही, दोन्ही पक्षाने त्याबाबत काहीही न दिल्याने न्यायालयाने त्यावर भाष्य करणं टाळलं…
- या प्रकरणात सीडीआर कुठल्याच आरोपींचे काढले नाही, जर का हे काढले असते तर ठोस पुरावे मिळाले असते…
- या प्रकरणात 12 काॅल रेकाॅर्ड केले आहेत यातील एक फोन आरोपीने पीसीओने केले होते
- पवनराजेंना फोनआलेला नाही मग साक्षीदार यांचा जबाब ग्राह्य कसा धरायचा…
- मूळ घटनेत आरोपींनी पवनराजेंच्या गाडीचा पाठलाग केला, गाडी निघाली पाठलाग झाला, पुढे जाऊन गाडी थांबवली…
- माफीचा साक्षीदार म्हणतो आम्ही इशाऱ्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगतो
- गाडी अशी बाजूला घेतली की समोर स्कोडा कार होती, मग आम्ही चालकाला विचारलं राजेसाहेब कुठे आहेत…
- त्याने झोपलेल्या पवनराजेंना उठवलं मग या दोघांनी गोळ्या झाडल्या, मग घटनास्थळाहून चौघे पुढे गेले
- घटनास्थळी तपासात स्कोडा कार एक्सप्रेस हायवेच्या उजव्याबादूवा खडीला लागून होती, स्पाॅट पंचनान्यात कुठेही उतार नाही
- साक्षीदार तपासले त्यांना सूचक वक्तव्य विचारला नाहीत…
- घटनास्थळी प्रात्यक्षिक केलेले नाही, रस्ता कुठेही स्लोप नव्हता…
- या पुराव्यांमध्ये न्यायालय ग्राह्य धरू शकत नाही
- उजव्या बाजूवर गाडी ढिगार्यावर चढत असेल तर ते तसे हेही स्पष्ट होत नाही
- घटनेनंतर घटनास्थळावरील साक्षीदार यांचे कंळबोली पोलिसांनी जबाब घेतले
- या दोन्ही साक्षीदार यांना खोटं बोलण्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही
- कळंबोली पोलिस ठाणे परिसरात बेवारस दुचाकी मिळून येते त्याची माहिती पोलिसांना एक देतो त्याची नोंद पोलीस घेतात…
- ही गाडी पंजाबची आहे हे वाहन तिथे कसे आले या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध हे तपासले गेलं नाही…
- माफीच्या साक्षीदाराने घटनेनंतर ग्रॅन्टरोडहून आरोपीला फोन केले, मात्र याची नोंदही कुठेही नाही, हत्येच्या दिवशी मुंबईबाहेर आरोपी कसे गेले याबाबत वेगवेगळ्या चार कथा सांगितल्या आहेत…
- कधी बोरिवलीहून गाडी पकडली सांगतो
- श्रीनाथजी मार्गे पडेसरीला गेल्याचे पहिल्या जबाबात म्हटले, दुसऱ्या जबाबात अहमदाबाद मग श्रीनाथने मग पडेसरीला गावी गेल्याचे सांगतो
- तिसऱ्या जबाबात कोर्टापुढे सुरवातीला बोरिवलीला गेले मग अहमदाबादची गाडी घेतली, तिथून मांडववाड्याला मित्राकडे गेला, मग मित्रांसोबत पडासरीला गेला
- चौथ्या जबाबात बोरिवली नाथद्वारा येथे गेला तिथून कोठारावर शाळेत राहिला मग मांडववाड्यात गेला मग अहमदाबादला गेला तिथे भाग्यदोयला राहिला त्याची नोंद त्याने दाखवली, मग मुंबईला आला, प्रत्येक वेळी वेगवेगळी स्टोरी…
- पवनराजे हत्याकांड प्रकरणात माफीच्या साक्षीदाराची साक्षचं विश्वासार्ह नाही…
- या खटल्यात माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर शिक्षा देता येत नाही…
- हा धागा सरकारी पक्षासाठी महत्वाचा होता मात्र वारंवार जबाब बदलल्याने माफीच्या साक्षीदाराचा जबाब ग्राह्य धरता येत नाही…
- संशयाचा फायदा घेऊन सर्व आरोपींवर गुन्हा सिद्ध होत नाही म्हणून न्यायालय आरोपींना निर्दोष मुक्त करत आहे…
नेमकं प्रकरण काय? (What is Pawanraje Nimbalkar Case)
3 जून 2006 रोजी मुंबईहून धाराशिवला (तेव्हाचं उस्मानाबाद) जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत. माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2009 पासून याप्रकरणी पद्मसिंह पाटील जामीनावर बाहेर आहेत. याप्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंह आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, तसेच शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी आहेत. राजकीय वैरातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव दोन आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली. आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती.
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे