Mamta Kulkarni On Aamir Khan: नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यानं घायाळ करणारी अभिनेत्री (Marathi Actress) म्हणजे, ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni). कधीकाळच्या दिग्गज अभिनेत्रीनं सध्या अध्यात्माचा मार्ग स्वीकारलाय. 90 च्या दशकात ममता कुलकर्णी (Actress Mamta Kulkarni) म्हणजे, अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत. अभिनयामुळेच नव्हे, तर त्यांच्या आकर्षक रूपामुळे आणि सौंदर्यामुळेही चर्चेत होत्या. सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir khan) यांसारख्या बड्या कलाकारांसोबत काम करून त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. ममता कुलकर्णी यांचं नाव कधीकाळी दाऊदसोबतही जोडलं गेलं होतं. पण, त्याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही एका सुपरस्टारसोबत त्यांचं नाव जोडलं गेलेलं, याबाबत फारच कमी लोकांना ठाऊक आहे. तो अभिनेता म्हणजे, आमिर खान.
ममता कुलकर्णी यांनी स्वतः एका मुलाखतीत आमिर खानसोबतच्या नात्याबाबत भाष्य केलंय. त्याकाळी आमिर खान आणि ममता कुलकर्णी यांच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या. कधीकाळी आमिर खान त्यांच्या प्रेमात एवढा आकंठ बुडालेला की, ममता कुलकर्णी यांच्याशी लग्न होऊ शकलं नाही, तेव्हा त्यानं कथितरित्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला, अशा चर्चा अधून मधून होत असतात. यावर आता ममता कुलकर्णी यांनी भाष्य केलंय.
आमिर खानसोबतच्या अफेअरवर नेमकं काय म्हणाल्या ममता कुलकर्णी? (Mamta Kulkarni On Aamir Khan)
खरं तर, ममता कुलकर्णी यांनी 1995 मध्ये ITMB Shows शी संवाद साधला होता. या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या युट्यूबवर शेअर करण्यात आला असून तो सध्या व्हायरल होतोय. मुलाखतीदरम्यान त्यांना आमिर खानसोबतच्या कथित अफेअरबद्दलच्या अफवांवर प्रश्न विचारण्यात आलाय. “मी ऐकलंय की, आमिर खान तुमच्या प्रेमात होता आणि तुमच्याशी लग्न करता न आल्यामुळे त्यानं आत्महत्येचा प्रयत्नही केला होता; हे खरं आहे का?” यावर प्रतिक्रिया देताना ममता कुलकर्णी म्हणालेल्या की, “नाही, नाही… ते खरं नाही… प्रसारमाध्यमं अशा गोष्टी रचत असतात. जर मी म्हटलं की, मला तुम्ही आवडता, तर त्याचा अर्थ असा होत नाही की, मी तुमच्या प्रेमात आहे…”
ममता कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, “आपल्या सिनेसृष्टीत प्रत्येक गोष्ट आधीच ठरलेली आणि कृत्रिमरीत्या घडवून आणलेली असते. मी खूप अबोल किंवा एकांतात राहणारी व्यक्ती आहे, मी माझं काम करते, शूटिंग करते आणि थेट घरी जाते…” प्रसारमाध्यम प्रत्येक गोष्ट कृत्रिमरीत्या सादर करत असल्यामुळे सर्वांनाच एका विशिष्ट पद्धतीनं वागणं भाग पडतं का? या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडलीय.
बनावट आहे इंडस्ट्री : ममता कुलकर्णी
या प्रश्नाला उत्तर देताना ममता कुलकर्णी म्हणाल्या की, “हो, तसं नाटक नक्कीच करावं लागतं. आम्हाला चोवीस तास मुखवटा घालून वावरावं लागतं. तुम्हाला अशी प्रतिमा निर्माण करावी लागते जी वास्तवाशी सुसंगत नसते, उदाहरणार्थ, या अफवाच घ्या ना… जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत थोडा वेळ बसलात, तर लगेच त्याचं ‘अफेअर’ असल्याचं लेबल लावलं जातं. लोक विचारू लागतात, “ममता आणि आमिर दोन तास का बोलत आहेत?”
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष