Canada vs Qatar FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 मध्ये कॅनडाने कतारविरुद्ध 6-0 असा दणदणीत विजय मिळवला. कॅनडाच्या विश्वचषकाच्या इतिहासातील हा पहिलाच विजय ठरला. जोनाथन डेव्हिडने (Jonathan David) शानदार हॅट्ट्रिक नोंदवत 1966 नंतर घरच्या मैदानावर विश्वचषकात हॅट्ट्रिक करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर सामन्याला गालबोट लागले. कॅनडाचा स्टार मिडफिल्डर इस्माईल कोने याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे संपूर्ण क्रीडाविश्व हादरले आहे.
मैदानावर नेमकं काय घडलं? (Ismael Kone Devastating Leg Injury)
सामन्याच्या दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला कतारचा मिडफिल्डर असिम मदिबो याने इस्माईल कोनेला टॅकल करण्याचा प्रयत्न केला. हा टॅकल इतका भयानक होता की, ते भिडताच कोने वेदनेने विव्हळत मैदानावर कोसळला. मैदानावरील परिस्थिती पाहता तातडीने वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, इस्माईल कोनेच्या पायाची दोन्ही प्रमुख हाडे तुटली आहेत. फुटबॉल जगतात ही अत्यंत गंभीर दुखापत मानली जाते. या दुखापतीमुळे कोने या चालू विश्वचषकातून बाहेर पडला असून, त्याला प्रदीर्घ काळ मैदानापासून दूर राहावे लागणार आहे.
Once again, it has been proven that football can take a life-changing turn at any moment. In yesterday’s FIFA World Cup match between Canada and Qatar, Canada’s key player, Ismaël Koné suffered a horrific injury, and his leg was broken into two pieces.💔🥹
– Just look at the…
— lndian Sports Netwrk (@IS_Netwrk29) June 19, 2026
स्टेडियममधील भावूक क्षण
कोनेला जेव्हा स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात येत होते, तेव्हा स्टेडियममधील हजारो चाहत्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्याचे मनोबल वाढवले. प्रचंड वेदनेत असतानाही कोनेने चाहत्यांना अभिवादन केले. त्याच्या जागी मैदानात आलेल्या नाथन सालिबा याने अवघ्या काही मिनिटांतच फ्री-किकवर अप्रतिम गोल केला. गोल केल्यानंतर सालिबाने कोनेची नंबर 8 ची जर्सी उंचावून हा गोल आपल्या जखमी सहकाऱ्याला समर्पित केला. या भावूक क्षणाने संपूर्ण कॅनडियन संघाला आणि चाहत्यांना भावूक केले.
सामन्यानंतर मैदानावर तुंबळ हाणामारी
कॅनडाचा हा ऐतिहासिक विजय आणि खेळाडूची दुखापत यानंतर मैदानाबाहेरचा माहोल अचानक तापला. सामना संपल्यानंतर कॅनडाचे प्रशिक्षक जेसी मार्श हे कतारचे प्रशिक्षक ज्युलिन लोपेटेगी यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी गेले. मात्र, त्यांच्यात काहीतरी वाद झाला आणि चर्चा चिघळली. पाहता पाहता दोन्ही बाजूंचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ टचलाईनजवळ एकमेकांसोबत भिडले. मैदानावर खेळाडूंमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि वाद झाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सुरक्षा रक्षक आणि सामना अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोन्ही संघांना वेगळे केले आणि वाद शांत केला.
Tempers flare between Canada and Qatar after the final whistle, leading to a player scuffle to conclude a dramatic match
LIVE UPDATES: https://t.co/Hb9FJ14WLh pic.twitter.com/0z5Vqmf50Z
— CTV News (@CTVNews) June 19, 2026
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला