जावेद जाफरीच्या पत्नीची फसवणूक प्रकरण, बीएमसीच्या निलंबित सहाय्यक आयुक्तांविरुद्ध मोठी कारवाई – Marathi News | Jaffrey wife 16 crore fraud case look out notice issued against Mahesh Patil Assistant Commissioner of the BMC


अभिनेता जावेद जाफरी याची पत्नी हबीबा आणि कुटुंबातील इतर सदस्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली. याआधी महेश पाटील यांनी निलंबित करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबीयांशी संबंधित एका गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा झवेरी बाजार येथील पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांचा असा संशय आहे की, निलंबित सहाय्यक आयुक्तांपर्यंत पोहोचण्यापूर्वी हा निधी अनेक बनावट कंपन्यांमार्फत वळवण्यात आला होता. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव गोकानी हा हवाला ऑपरेटर आहे जो दुबईला फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. पण अद्याप त्याचा कोणताच पत्ता लागलेला नाही.

तर फसवणुक प्रकरणातील आरोपी असलेले निलंबित सहाय्यक आयुक्त अधिकारी महेश पाटील यांच्याकडे पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी, नीरवने कथितरित्या पूजन टेक्नॉलॉजीज नावाच्या कंपनीमार्फत अनेक पेमेंट स्वीकारले होते. दरम्यान, पाटील देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतात यामुळे गुन्हे शाखेने अलीकडेच त्यांच्याविरुद्ध लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी केले आहे.

प्रकरणाच्या तपशिलानुसार, यूके-स्थित व्यावसायिक निशित पटेल यांच्यावर वांद्रे पश्चिम येथील न्यू कमल कुंज प्रकल्पाच्या पुनर्विकासाशी संबंधित गुंतवणुकीतून आकर्षक परताव्याचे आश्वासन देऊन जाफरी, त्यांची पत्नी हबीबा आणि कुटुंबातील इतर सदस्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तींवर जावेद जाफरीची पत्नी हबीबा जाफरीची 16 कोटी 24 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

सांगायचं झालं तर, एप्रिल 2024 मध्ये जावेद जाफरीची पत्नी हबीबा जाफरी यांना अंधेरी इथल्या त्यांच्या बंगल्यावरील मालमत्ता करारासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून एक नोटीस मिळाली होती. अशात पाटील यांनी अभिनेत्याच्या पत्नीला टॅक्स – सेटलमेंटचं आश्वासन दिलं… त्यानंतर वांद्रे पश्चिम इथल्या ‘न्यू कमलकुंज’ या व्यावसायिक प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. आधी अभिनेत्याच्या पत्नीचा विश्वास संपादन केला, त्यानंतर फसवणूक केली. आता पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत असून, याप्रकरणात आणखी किती लोकांचा सहभाग आहे याची चौकशी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *