Ramdas Kadam on Operation Tiger: उद्धवजी हे लोकं तुम्हाला फसवतायत, सातवा खासदारही फुटलाय, तो मंत्रिपद मागत होता; रामदास कदमांचा सनसनाटी दावा


Ramdas Kadam on Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’मुळे (Operation Tiger) शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) 6 खासदार फुटल्याची धक्कादायक बातमी ताजी असतानाच, आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. “उद्धवजी, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला फसवत आहेत. ठाकरे गटाचे 7 खासदार फुटले आहेत. तो मंत्रीपद (Ministry) मागत होता, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे. तसेच, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत प्रहार केला आहे.

रामदास कदम म्हणाले की, “शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा. माझ्यासमोर बाळासाहेब ठाकरे दिसतात. चातक जसा पावसाची वाट पाहतो, तशी शिवसेना प्रमुखांची शिवसैनिक वाट पाहायचा. दसऱ्याच्या दिवशी लाखो शिवसैनिक जमा व्हायचे. दुर्दैवाने शिवसेना प्रमुख नाहीत, ते कधी आमदार, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष झाले नाहीत. कुठलंही शासकीय पद न घेता इतर कार्यकर्त्यांना सन्मान द्यायचे, पद द्यायचे. पंत धावत यायचे, नारायण राणे धावत यायचे. रिमोट कंट्रोल साहेबांनी ठेवला होता. एका शब्दावर जीव द्यायला तयार असायचे. मराठी माणूस ताठ मानेनं जगतोय, कारण बाळासाहेब, असे त्यांनी म्हटले. 

Ramdas Kadam on Uddhav Thackeray: नाहीतर शिवसेना नंबर 1 असती

रामदास कदम पुढे म्हणाले की, उद्धवजींनी बाळासाहेबांना फॉलो नाही केलं, नाहीतर शिवसेना नंबर 1 असती. उद्धवजींनी काय मिळवलं मुख्यमंत्री म्हणून? काँग्रेससोबत जात पदं मिळवलीत. ज्यात रामदास कदम आऊट, दिवाकर रावते आऊट. काय साध्य केलं उद्धव ठाकरेंनी यातून? वाईट वाटतं, मला पण दुःख होतं. एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलं पाहिजे. टायगर कोण? तर एकनाथ शिंदे. त्यांनी प्रतिमा उभी केली की ते नेतृत्व उभं करू शकतात. आम्हाला एकनाथ शिंदेंचा अभिमान वाटतो. 6 खासदार बाहेर गेलेत, 10 लोक मंत्रीपदं सोडत बाहेर गेले होते. संजय राऊत यांना हे समजत नाही. गुलाबराव पाटील यांनी 20 आमदारांसोबत हात जोडून विनंती केली होती, मात्र उद्धव ठाकरेंनी गेटआऊट केलं. लोक का जातात? याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी दाव्याने सांगतो राऊत फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात.

Ramdas Kadam on Uddhav Thackeray: उद्धवजी, अजूनही वेळ गेली नाही

बाळासाहेब ठाकरे आमची बैठक घ्यायचे. सगळ्यांची मतं जाणून घ्यायचे, विचारायचे आणि मग ते स्वतः निर्णय घ्यायचे. उद्धव ठाकरे, आपण कधी बैठका घेतल्यात का? ही वेळ का येते? उद्धवजी, हे लोकं तुम्हाला फसवत आहेत. सातव्या खासदाराची देखील सही आहे. तो माणूस बाजूला बसला होता, मंत्रीपद मागत होता, असा दावा रामदास कदम यांनी केला. रामदास कदम पुढे म्हणाले की, आता सगळा डोलारा खाली आला. एकनाथ शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली, याचा अभिमान आम्हाला वाटतो. उद्धवजी, अजूनही वेळ गेली नाही. फक्त आदित्यसाठी पक्षाची वाट लावली आहे. त्याला आम्ही साहेब म्हणायचं. माझ्या चेंबरला आदित्य यायचे तेव्हा मी उठायचो, खुर्ची द्यायचो. मात्र मला काय माहिती होतं ते माझंच मंत्रीपद घेतील? मातोश्री आमचं मंदिर होतं, खूप वाईट वाटलं. ही आजची वेळ का यावी? का सगळे बाहेर पडलेत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.   

Ramdas Kadam: मुंबईचे 25 नगरसेवक संपर्कात 

रामदास कदम पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी स्वतः मातोश्रीवरून बाहेर पडावं. एकनाथ शिंदे खूप पुढे गेले आहेत. ते आता जगात मोठे होतील. उद्धव ठाकरेंची आजूबाजूची लोकं त्यांना फसवत आहेत. उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसणाऱ्याची सही आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससोबत गेलेत, तेव्हाच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बुडवलेत, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. आमदारांना, खासदारांना कामं करण्यासाठी निधी मिळणार नसेल, तर राजकीय अस्तित्व धोक्यात येणार आहे ना? उद्धव ठाकरेंसोबत राहत निधी मिळणार नसतील तर काय? आमदार नक्कीच येतील ना. मुंबईचे नगरसेवक देखील सोबत येतील. मुंबईचे 25 नगरसेवक संपर्कात आहेत. मी आमदारांचं आज काही बोलणार नाही, मात्र ते आमदार उद्धव ठाकरेंजवळ 2029 पर्यंत शिल्लक राहणार नाहीत, असा दावा देखील रामदास कदम यांनी केला. 

Ramdas Kadam on Sanjay Raut: रामदास कदमांचा संजय राऊतांवर निशाणा

संजय राऊत साहेब यांना नियम माहिती नाही. वेगळ्या गटाची परवानगी मिळाली तर मान्यता देता येते, ते नियमित होतात. गट एकदा झाला तर मग पक्षप्रवेश करता येतो. मात्र, त्यांनी शिव्या घालायला सुरुवात केली, तेव्हा सगळे खासदार गेले देखील नव्हते. सुरतला आमदार गेले नव्हते, तेव्हा ते त्यांची आयमाय काढत होते. उद्धव ठाकरेंना कळावं म्हणून मी हे बोललो,” असे म्हणत रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

आणखी वाचा 

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: पक्ष सोडताच ओमराजे निंबाळकरांचा पहिला वार, म्हणाले, उद्धव ठाकरेंचं समजू शकतो, पण आदित्य ठाकरेंनी….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *