Last Updated:
Rohini Paradhye death investigation : रीलस्टार रोहिणी पारामध्ये मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. पती निलेश पाराध्ये याने रोहिणीचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, त्यामुळेच तिने टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती समोर येतीये.
Rohini Paradhye death case : सोशल मीडियावर आपल्या रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय रिल स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला तब्बल 25 दिवसानंतर वेगळं वळण लागलं. रोहिणी पाराध्ये ही रील्सच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करायची आणि लोकांना पोटधरून हसवायची. पण आता तिनेच टोकाचं पाऊल उचलल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. ज्या हॉटेलमध्ये ती रील बनवायची, त्याच हॉटेलच्या किचनमध्ये तिने आपल्या आयुष्याचा द एन्ड केला. अशातच आता पोलिसांनी तब्बल 25 दिवसानंतर मोठं पाऊल उचललं आहे.
रोहिणीच्या मृत्यूला जबाबदार धरत, तिचा पती निलेश पाराध्ये याच्यावर मंगळवेढा पोलिसांत अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती निलेश पाराध्ये याने रोहिणीचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, त्यामुळेच तिने टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती समोर येतीये. रोहिणीच्या वडिलांनी मंगळवेढा पोलीस चौकीत फिर्याद नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण आरोपी घरगुती कारणास्तव रोहिणीला त्रास देत होता, असं तिच्या वडिलांनी आरोप केला आहे.
Solapur,Maharashtra
