Santosh Bangar on Shivsena Operation Tiger: ‘आगे आगे देखो होता है क्या!’ 6 खासदार फुटल्यानंतर संतोष बांगरांचा मोठा दावा; म्हणाले, ‘ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार…’


Santosh Bangar on Shivsena Operation Tiger: राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान आणि मोठ्या घडामोडी घडत असून, तब्बल चार वर्षांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena UBT) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) यशस्वी झाल्याचे आता स्पष्ट झाले असून ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या (Parliamentary Party) बैठकीला पक्षाचा व्हीप (Whip) धुडकावून 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे खासदार आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित मानले जात आहे. या मोठ्या राजकीय भूकंपावर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून ठाकरे गटाचे आणखी 13 ते 14 आमदार फुटणार असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

Santosh Bangar on Shivsena Operation Tiger: काय म्हणाले आमदार संतोष बांगर?

खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि इतर खासदारांच्या बंडखोरीवर बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की, “सहा महिन्यांपूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सहाही खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आम्हाला जशी बातमी कळली तसे आम्ही नागेश पाटील आष्टीकर यांचे स्वागत हिंगोलीमध्ये केलेलं आहे. नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिवसेनेमधील प्रवेशानंतर पक्षाला बळ मिळणार आहे, यामुळे शिवसेना वाढणार आहे, असे त्यांनी म्हटले. 

Santosh Bangar on Shivsena Operation Tiger: ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार शिंदे गटात जाणार

महाराष्ट्रामध्ये सुद्धा उबाठाचे आमदार प्रवेश करणार आहेत का? यावर विचारले असता ‘आगे आगे देखो होता है क्या’ असं संतोष बांगर म्हणाले आहेत. तुम्ही जे बोलले ते सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. 13 ते 14 आमदार उबाठाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला. 

बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना सन्माननीय एकनाथ शिंदे यांची आहे, एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार करून महाराष्ट्राला पुढे नेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पाहिलं आहे की, महाराष्ट्राची जनता एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे आहे. मागील दोन वर्षांपासून जो विकास हिंगोली जिल्ह्याचा रखडलेला होता तो विकास नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून होणार आहे,” असे देखील संतोष बांगर म्हणाले. 

Nagesh Patil Ashtikar: नागेश पाटील आष्टीकरांच्या स्वागताचे हिंगोलीत बॅनर

दरम्यान, ठाकरे गटाकडून हिंगोली लोकसभेतून निवडून आलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) हे देखील या 6 बंडखोर खासदारांमध्ये सामील आहेत. आष्टीकर यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच हिंगोलीमध्ये त्यांचे स्वागत करणारे मोठे बॅनर झळकले आहेत. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरामध्ये हे बॅनर लावले असून, “नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन” असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटल्याचा दावा?

1. संजय जाधव (परभणी)

2. संजय देशमुख (यवतमाळवाशिम)

3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)

5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)

Uddhav Thackeray Shivsena MP List : उद्धव ठाकरेंसोबत कोणते खासदार?

1. अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)

2. अनिल देसाई (दक्षिण मध्य)

3. राजाभाऊ वाजे (नाशिक)

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Shivsena Vardhapan din 2026: शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा, ‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर मुंबईतील मैदान कोण गाजवणार? ठाकरे-शिंदेंच्या मेळाव्यांकडे राज्याच्या नजरा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *