ओमराजे निंबाळकर यांना जोरदार दणका, उद्धव ठाकरेंची साथ सोडणे महागात, थेट 15 हजार.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar has suffered major setback even before joining the Shinde faction of the Shiv Sena


शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागले. हा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्याकरिता आहे. आजच हे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. शिवसेना ठाकरे गट दुसऱ्यांना फुटला आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. एकनाथ शिंदे मुंबईत आहेत तर श्रीकांत शिंदे दिल्लीत या फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाण मांडून आहेत. श्रीकांत शिंदे यांच्याकडूनच खासदारांसाठी विमान बुक करण्यात आले. ओमराजे निंबाळकर, संजय जाधव यासारखे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. हा उद्धव ठाकरे यांना मोठा झटका आहे. पक्ष सोडण्यामागचे कारणही काही खासदारांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, ठाकरे गटाकडून विविध दावे केली जात आहेत.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. काल शिवसेना ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना बैठकीसाठी व्हिप जारी करण्यात आले होते. त्या बैठकीला ओमराजे निंबाळकर अनुपस्थितीत होते. ओमराजे निंबाळकर ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट आहे. 20 तारखेला सर्व गोष्टींवर बोलणार असल्याचेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

ओमराजे निंबाळकर यांच्याकडून 20 जूनला भूमिका जाहीर केली जाणार असली तरीही मोठा दणका त्यांना सोशल मीडियावर बसताना दिसत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर अनफॉलो करण्याचा ट्रेंड वेगात सुरु आहे. 2 दिवसात 15 हजार तरुण फॉलोवर्सने खासदार निंबाळकरांना अनफॉलो केले. सतत त्यांना अनफॉलो केले जात आहे.

2 दिवसात तब्बल 15 हजार लोकांनी ओमराजे निंबाळकर यांना अनफॉलो केले. खासदार ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावरती सक्रिय असलेले खासदार आहेत. पक्षांतराच्या चर्चेनंतर ओमराजेंना नेटकऱ्यांचा संतापजनक कमेंट आणि हजारो तरुणांनी केले अनफॉलो केले. ओमराजे निंबाळकर यांचे पक्षांतराची भूमिका लोकांना पटल्याची दिसत नाही. सतत त्यांचे फॉलोवर्स कमी होत आहेत.

ओमराजे निंबाळकर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असतात. त्यांचे अनेक रिल्स व्हायरल होतात. मात्र, उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांचा हात ओमराजे निंबाळकर यांनी पकडला. मात्र, हीच गोष्ट लोकांना आवडली नसल्याचे बघायला मिळत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *