सलमान, शाहरूख, आमिरसोबत काम! आता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रस्त्यावर; का आली फुटपाथवर झोपायची वेळ? | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Bollywood Actor Sleeping On Footpath : अभिनेत्याला फुटपाथवर झोपलेला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्याच्यावर अशी वेळ का आली? असा प्रश्न कित्येकांना पडला आहे.

News18
News18

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की कित्येक जण त्यांच्या लक्झरी लाइफस्टाईलसाठी ओळखले जातात. असाच एक बॉलिवूड अभिनेता तो रस्त्यावर आलेला दिसला. तो चक्क फुटपाथवर झोपला आहे. अभिनेत्याला फुटपाथवर झोपलेला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्याच्यावर अशी वेळ का आली? असा प्रश्न कित्येकांना पडला आहे.

रात्रीच्या वेळी रस्त्यावर, फुटपाथवर, ब्रीजखाली कितीतरी लोक झोपलेले दिसतील. याच लोकांमध्ये एका अभिनेत्याला झोपलेलं पाहून त्याचे चाहते शॉक झाले. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कॅमेरा रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तींना शूट करत पुढे जातो. अरे हे काय? हा तर अभिनेता. कॅमेरा अभिनेत्यावर जाताच धक्का बसतो. अंगावर टी-शर्ट आणि हाफ पँट आणि अंगाखाली फक्त एक चादर. असा हा अभिनेता झोपलेला दिसला. इतर सामान्य लोकांमध्ये तो अगदी आरामात झोपलेला दिसतो आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नाही तर सुनील ग्रोव्हर आहे. आपल्या विनोदाने करोडो लोकांना हसवणारा कलाकार. त्याने ‘द कपिल शर्मा शो’ मधील गुत्थी आणि डॉ. मशहूर गुलाटी सारख्या पात्रांनी घराघरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. तो फक्त एक उत्तम कॉमेडियनच नाही, तर एक अप्रतिम अभिनेता देखील आहे. त्याने बॉलिवूडच्या अनेक मोठ्या आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आमिर खानचा ‘गजनी’, सलमान खानचा ‘भारत’ आणि शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जवान’ मधील त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. याशिवाय तो ‘बागी’, ‘हिरोपंती’ आणि ‘राधे’सारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. ‘तांडव’ या वेब सीरिजमधील त्याच्या गंभीर भूमिकेने प्रेक्षकांना थक्क केलं होतं.

आपल्या लाडक्या कलाकाराची अशी अवस्था पाहून एकवेळ तर चाहतेही थक्क आणि चकीत झाले. मात्र, जेव्हा या व्हिडिओमागचे पूर्ण सत्य समोर आलं, तेव्हा प्रत्येक जण त्याचे कौतुक करू लागला.  सुनील ग्रोव्हरने स्वत: त्याचा हा व्हि़डीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना एक अतिशय सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. ‘तारे जमीन पर’ असं त्याने म्हटलं आहे.

सुनील अनेकदा आपल्या सोशल मीडियावर अशा प्रकारचे मजेशीर आणि आगळेवेगळे व्हिडिओ शेअर करण्यासाठी ओळखला जातो. कधी तो रस्त्याच्या कडेला चहा बनवताना दिसतो, तर कधी भाजी विकताना. त्याच्या या व्हिडीओने दाखवलं की, एवढ्या मोठ्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्याचे पाय आजही जमिनीवरच आहेत.

सुनीलचा हा अंदाज पाहून चाहते खूप प्रभावित झाले आहेत. व्हिडिओवर कमेंट्सचा पूर आला आहे. कोणी त्याच्या या साधेपणाला सलाम करत आहे, तर कोणी याला डाऊन टू अर्थ म्हणजे जमिनीशी जोडलेला स्वभाव म्हणत आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

सलमान, शाहरूख, आमिरसोबत काम! आता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रस्त्यावर; का आली फुटपाथवर झोपायची वेळ?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *