Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींची भाग्योदयाची वेळ! जूनचा शेवटचा आठवडा नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 22 to 28 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, जून (June 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा 22 ते 28 जून 2026 असा असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर प्रभाव होणार आहे. कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे तर कोणाचं नुकसान होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तूळ ते मीन या 6 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. या आठवड्यात प्रेम जीवनात रोमँटिक वातावरण राहील. जोडीदारासोबत आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. करिअरमध्ये नवीन प्रकल्पांमुळे यश मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही मोठी समस्या दिसत नाही. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी नवीन आठवड्यात भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये संयम बाळगल्यास नाते अधिक मजबूत होईल. करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा चांगला काळ आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. आरोग्याच्या बाबतीत रक्तदाब आणि तणावावर लक्ष ठेवावे. 

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी जून महिन्याचा शेवटचा आठवडा उत्तम असेल. या काळात प्रेम जीवनात आनंद आणि उत्साह राहील. जोडीदारासोबत प्रवासाचे योग आहेत. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल आणि व्यवसायात चांगला लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्य चांगले राहील आणि आत्मविश्वास वाढेल.. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवडा नातेसंबंधांमध्ये स्थैर्य आणि विश्वास वाढेल. प्रेम जीवन सुखकर राहील. करिअरमध्ये मेहनतीमुळे मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे. आरोग्याच्या बाबतीत सांधेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या काळात प्रेम जीवनात नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये सर्जनशीलतेचा फायदा होईल. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो, त्यामुळे नियोजन आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने डोळे आणि मान यांची विशेष काळजी घ्यावी.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा प्रेम आणि नातेसंबंधांसाठी अनुकूल राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. 

हेही वाचा

Shravan 2026: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता..श्रावण महिना ‘या’ दिवसापासून होतोय सुरू! यंदा श्रावणी सोमवार किती? धार्मिक महत्त्व, तिथी, संबंधित माहिती…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *