India a Squad ODI Tri-Series : भारतीय अ संघात अचानक मोठा फेरबदल; अष्टपैलू खेळाडूची टीममध्ये ‘सरप्राइज’ एन्ट्री, कोण आहे तो?


India A Tour of Sri Lanka : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 19 मे रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ (Team India ODI Squad Vs Afghanistan) जाहीर केला. 15 सदस्यीय भारतीय संघात शुभमन गिलची (Shubhman Gill) कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) उपकर्णधारपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs Afg ODI Series) यांच्यातील ही एकदिवसीय मालिका 14 ते 20 जून या कालावधीत खेळवली जाणार आहे.

दरम्यान, भारत ‘अ’ संघात आगामी श्रीलंका दौऱ्यापूर्वी मोठा बदल करण्यात आला आहे. 9 जूनपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी हर्ष दुबेची निवड झाली होती. मात्र, त्या संघात 27 वर्षीय अष्टपैलू खेळाडू अनुकूल रॉयने त्याची जागा घेतली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाल्यामुळे दुबेला इंडिया ‘अ’ संघातून वगळण्यात आले आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या संधीमुळे हर्ष दुबेला इंडिया ‘अ’ संघातून वगळले (India a Squad ODI Tri-Series)

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समितीने नुकतीच अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली. या मालिकेमुळे हर्ष दुबेला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. या संधीमुळेच अनुकूल रॉयचा इंडिया ‘अ’ संघात समावेश झाला आहे.

अनुकूल रॉयची कामगिरी (Anukul Roy Replaces Harsh Dubey)

27 वर्षीय अष्टपैलू खेळाडू अनुकूल रॉय, हर्ष दुबेप्रमाणेच, सध्या आयपीएल 2026 मध्ये खेळत आहे. आयपीएल 2026 मध्ये रॉय केकेआर संघाचा सदस्य आहे. अनुकूल रॉयने या हंगामात 13 सामन्यांमध्ये 8 बळी घेतले असून 43 धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 48 डावांमध्ये 32.79 च्या सरासरीने 1219 धावा केल्या आहेत आणि 59 बळी घेतले आहेत. भारत ‘अ’ संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर एकदिवसीय तिरंगी मालिका खेळणार आहे. 9 ते 21 जून दरम्यान चालणाऱ्या या मालिकेत अफगाणिस्तान तिसरा संघ असेल.

एकदिवसीय तिरंगी मालिका वेळापत्रक (India Sri Lanka Afghanistan ODI Tri-Series Schedule)

  • 9 जून : भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
  • 11 जून : भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ
  • 13 जून : अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ
  • 15 जून : भारत अ विरुद्ध श्रीलंका अ
  • 17 जून : भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ
  • 19 जून : अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ
  • 21 जून: अंतिम सामना

वनडे तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघ (India ‘A’ Squad for the ODI Tri-Series) 

तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, अनुकुल रॉय, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान. 

हे ही वाचा –

Hardik Pandya Fined : मैदानावर जे घडलं कॅमेऱ्यात ते सगळं कैद झालं! हार्दिक पांड्यावर BCCIची मोठी कारवाई; नेमकं कोणत्या चुकीची मिळाली शिक्षा?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *