126 बॉलमध्ये 306 रन ठोकल्या, भारतीय पोरीने इतिहास घडवला, कोण आहे अक्षरा गुप्ता? | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

क्रिकेट विश्वात सध्या फक्त एकाच नावाची चर्चा सुरू आहे. 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी क्रिकेटच्या मैदानात रोज नवे विक्रम बनवत आहे. एकीकडे बिहारच्या वैभवची चर्चा सुरू असतानाच बिहारच्या मुलीनेही क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास घडवला आहे.

126 बॉलमध्ये 306 रन ठोकल्या, भारतीय पोरीने इतिहास घडवला, कोण आहे अक्षरा गुप्ता?
126 बॉलमध्ये 306 रन ठोकल्या, भारतीय पोरीने इतिहास घडवला, कोण आहे अक्षरा गुप्ता?

मुंबई : क्रिकेट विश्वात सध्या फक्त एकाच नावाची चर्चा सुरू आहे. 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी क्रिकेटच्या मैदानात रोज नवे विक्रम बनवत आहे. एकीकडे बिहारच्या वैभवची चर्चा सुरू असतानाच बिहारच्या मुलीनेही क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास घडवला आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या महिला अंडर-19 वनडे ट्रॉफीमध्ये पहिल्याच दिवशी अक्षरा गुप्ताने विक्रमी बॅटिंग केली.

फोर-सिक्सनेच मारल्या 268 रन

रक्सोलमध्ये राहणाऱ्या अक्षरा गुप्ताने वादळी बॅटिंग करून 126 बॉलमध्ये 306 रन केले. भागलपूरच्या सॅन्डिस कंपाऊंड मैदानावर झालेल्या सामन्यात अक्षरा गुप्ताने बॉलरवर पहिल्या बॉलपासूनच आक्रमण केलं. 233 मिनिटांच्या या खेळीमध्ये अक्षराने 126 बॉलमध्ये 242.86 च्या स्ट्राईक रेटने 306 रनची नाबाद खेळी केली. अक्षराने तिच्या या ट्रिपल सेंच्युरीमध्ये 55 फोर आणि 8 सिक्स मारल्या, म्हणजेच 306 पैकी 268 रन तर तिने फोर आणि सिक्स मारूनच केल्या.

34 बॉलमध्ये शतक पूर्ण

अक्षराने फक्त 16 बॉलमध्ये तिचं अर्धशतक पूर्ण केलं, यानंतर तिला शतक पूर्ण करायला 34 बॉल लागले. अक्षराच्या आधी मुंबईच्या इरा गुप्ताने स्थानिक सामन्यात नाबाद 346 रन केले होते, ज्यात 42 फोर आणि 16 सिक्सचा समावेश होता. आता अक्षरा गुप्ताही इराच्या क्लबमध्ये जाऊन पोहोचली आहे.

अक्षरा भविष्याची स्टार

बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हर्ष वर्धन यांनी अक्षराचे तिच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केले. बिहारच्या मुली सातत्याने राज्याला गौरव मिळवून देत आहेत. या खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बीसीए पूर्णपणे कटिबद्ध आहे, असं हर्ष वर्धन म्हणाले.

बीसीएचे सचिव झियाउल अरीफिन यांनीही अक्षराला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या सुरुवातीलाच अशा प्रतिभेचा उदय होणे हे बिहार क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्याचे लक्षण आहे, असं अरीफिन म्हणाले. रक्सौलची रहिवासी असलेली अक्षरा गुप्ता आधीच अत्यंत प्रतिभावान मानली जात होती, पण या त्रिशतकामुळे ती लवकरच जागतिक क्रिकेटच्या सर्वात मोठ्या मंचावर भारतीय जर्सीमध्ये आपली छाप पाडताना दिसेल, असा विश्वास बिहार क्रिकेट असोसिएशनने व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *