Suhasini Mulay On Her Marriage At The Age Of 60: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अशा अनेक अभिनेत्री (Bollywood Actress) आहेत, ज्यांचं लग्नाचं वय निघून गेलंय, तरीही त्या अविवाहित आहेत. तर, काही अशाही आहेत, ज्यांनी लग्नाचं वय उलटून गेल्यानंतर त्यांनी आपली लग्नगाठ बांधलीय. अशाच एका अभिनेत्रीबाबत आपण बोलतोय, जिनं वयाच्या 60 व्या वर्षी आपली लग्नगाठ बांधली, तेसुद्धा फेसबुकफ्रेंडसोबत. विशेष म्हणजे, भेटल्यानंतर अवघ्या 75 दिवसांतच या जोडप्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि संसारही थाटलाय.
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलतोय, ती म्हणजे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे (Actress Suhasini Mulay). त्यांनी वयाच्या साठीत फेसबुक फ्रेंडसोबत लग्न केलंय. मराठमोळ्या सुहासिनी मुळे (Suhasini Mulay) यांना योग्य व्यक्ती न भेटल्यामुळे वयाच्या साठीपर्यंत त्या अविवाहित राहिल्या. पण, एक दिवस अचानक एका शास्त्रज्ञासोबत त्यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे काय म्हणाल्या? (Suhasini Mulay On Her Marriage At The Age Of 60)
एका मुलाखतीत बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी अगदी बेधडकपणे आपल्या लग्नाबाबत सांगितलं. त्यांनी 60व्या वर्षी आपली लग्नगाठ बांधली. वयाच्या साठीपर्यंत त्या अविवाहित होत्या. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “मी वयाच्या 60 व्या वर्षी पहिल्यांदा लग्न केलं… तोपर्यंत मला माझा जोडीदार मिळाला नव्हता. माझे पती एक नामवंत शास्त्रज्ञ आहेत… ते जेव्हा विज्ञानाबद्दल बोलतात, तेव्हा मला काहीच समजत नाही, पण ते एक उत्तम व्यक्ती आहेत…”
अभिनेत्री सुलेखा तळवलकरच्या युट्यूब चॅनलवर बोलताना सुहासिनी मुळे यांनी काही गोष्टींबाबत खुलासा केला. त्या म्हणाल्या की, एका सह-कलाकारानं त्यांना फेसबुकवर अकाउंट ओपन करण्याबाबत सुचवलेलं. त्या सह-कलाकारानं सांगितलं होतं की, या प्लॅटफॉर्ममुळे कामाच्या नव्या संधी मिळू शकतात, म्हणून त्यांनी फेसबुक अकाउंट ओपन केलं… एक दिवस फेसबुक पाहत असताना त्यांना एक प्रोफाईल दिसलं, ज्यानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं.
“ज्यानं आम्हा दोघांचंही आयुष्य बदलून टाकलं…” (Suhasini Mulay Married At The Age Of 60)
पुढे बोलताना सुहासिनी मुळे म्हणाल्या की, “मी अतुलचे प्रोफाइल पाहिले आणि विचार केला, ‘भौतिकशास्त्रज्ञ फेसबुक वापरतात का?’, तो ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’वर काम करत होता. मला विज्ञानात नेहमीच रस असल्यामुळे, मी त्याला एक मेसेज पाठवून विचारलं की, ‘LHC म्हणजे काय?’ त्याच्या उत्तरानं एका अशा संभाषणाला सुरुवात झाली, ज्यानं आम्हा दोघांचंही आयुष्य बदलून टाकलं. ईमेल दरम्यान, अतुलनं तिला सांगितलं की, तो एका लाईफ पार्टनरच्या शोधात आहे…”
“त्यानं कधीही थेट मागणी घातली नाही, पण तसे संकेत दिले होते. जेव्हा माझ्या लक्षात आले की तो कोणाच्यातरी शोधात आहे, तेव्हा मी मनातल्या मनात हसले. मी विचार केला, ‘जर मला 60 वर्षांत माझ्यासाठी योग्य व्यक्ती सापडली नाही, तर तो मला आता अचानक कसा सापडेल?”, असं सुहासिनी मुळे म्हणाल्या. मात्र, या टप्प्यावरही त्या गोंधळलेल्या होत्या आणि त्यांना काय करावं हे सुचत नव्हते, म्हणून त्यांनी एका मैत्रिणीचा सल्ला घेतला. सुहासिनी मुळे यांना त्यांच्या मैत्रिणीनं सांगितलं की, या वयात पर्याय मर्यादित असतात. दार उघडण्याआधीच ते बंद करू नकोस. जर तुला ते आवडले नाही, तर तू नक्कीच पुढे जाऊ शकतेस. पण, प्रयत्न करायला काहीच हरकत नाही…
नंबर मागितल्यावर अभिनेत्रीचा स्पष्ट नकार (Suhasini Mulay On Her Marriage)
“जेव्हा अतुल यांनी माझा नंबर मागितला, तेव्हा मी त्यांना म्हणाले, “चांगल्या मुली अनोळखी व्यक्तींना आपला फोन नंबर देत नाहीत…” इंटरनेटवरील बनावट प्रोफाईल्सबद्दलही त्यांच्या मनात भीती होती. त्यांची ओळख पटवण्यासाठी सुहासिनीनं त्यांच्या फेसबुकवरील फोटोंची पडताळणी त्यानं काम केलेल्या संस्थेतील माहितीशी केलेली, असंही सांगितलं.
लग्नाच्या वेळचा एक गंमतीशीर किस्सा
सुहासिनी मुळे यांनी सांगितलं की, “जेव्हा आम्ही आमच्या लग्नाची नोंदणी करायला गेलो, तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याला वाटलं की, मी माझ्या आधीच्या लग्नाचं प्रमाणपत्र घ्यायला आलेय… पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की, आम्ही आमच्या लग्नाची नोंदणी करण्यासाठी आलोत, तेव्हा त्या अधिकाऱ्यानं आमच्याकडे पाहिलं आणि विचारलं, “तुम्ही… आणि काका?” हे ऐकून आम्ही दोघेही खळखळून हसलो…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष