Fortuner कुठे घेता आता? 27 दिवसांनी स्वस्तात मस्त Audi आणा घरी, भारत-UK करारामुळे किंमत होणार कमी! | ऑटो


Last Updated:

आता तुम्हाला स्वप्न पुर्ण करण्याची चांगली संधी चालून आली आहे. कारण भारतात आता युरोपियन गाड्या स्वस्त होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ऑडी विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर ती सुद्धा तुमच्या बजेटमध्ये येणार आहे. 

News18
News18

भारतात एकीकडे महागाईने मध्यमवर्गीय कुटुंबीयांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे आपल्या दारात एखादी कार असावी असं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांचं स्वप्न हे आता स्वप्नचं राहिलं आहे. पण, आता तुम्हाला स्वप्न पुर्ण करण्याची चांगली संधी चालून आली आहे. कारण भारतात आता युरोपियन गाड्या स्वस्त होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ऑडी विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर ती सुद्धा तुमच्या बजेटमध्ये येणार आहे.

कारण की, भारत आणि युनायटेड किंगडम (UK) दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे. हा मुक्त व्यापार करार 15 जुलैपासून प्रत्यक्षात लागू होणार आहे. फ्रान्समधील एव्हियां-ले-बँ येथे सुरू असलेल्या जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता युरोपियन गाड्या, दारू आणि उद्योग जगतातील बऱ्याच वस्तू स्वस्त होणार आहे.

खास करून कारच्या किमतींमध्ये खूप मोठी कपात होणार आहे. ब्रिटनमधून थेट आयात होणाऱ्या कारवर आता मूळ सीमाशुल्क  ११० टक्क्यांवरून थेट १० टक्क्यांवर येणार आहे.  पहिल्या टप्प्यात हे शुल्क ११० टक्क्यांवर आधी  ३० ते ४० टक्के आणि नंतर १० टक्के होईल.

BMW सीरीज 3 :  या करारामुळे ब्रिटनच्या लोकप्रिय ब्रँड्सच्या गाड्यांच्या किमती कमी होणार आहे.  भारतात लोकप्रिय असलेली BMW कारही स्वस्त होईल. BMW 3 सीरीजची किंमत ६० ते ७५ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. आता ही कार ४० ते ५५ लाखांपर्यंत येऊ शकते. जवळपास १५ ते २५ लाख रुपयांपर्यंतची बचत होईल.

Mercedes-Benz C-Class : मर्सिडीजच्या कार म्हणजे, दुसरा महालचं. त्यामुळे आता ही लक्झरी कार जर ६० ते ७० लाख रुपयांच्या दरम्यान असेल तर आता. एफटीए नंतर किमतीत ३० ते ४० टक्के घट होईल आणि भारतात नवीन किंमत ४० ते ५० लाख रुपये इतकी होईल.

Audi A4/A6 : आज भारतात Audi ही एक लक्झरी कार आहे. ऑडी ही जर्मन कंपनी आहे, जी फॉक्सवॅगन ऑटो मेकरचाच एक भाग आहे. सध्या देशात ऑडी कारची सुरुवाती किंमत ४५ से ७० लाखांच्या दरम्यान आहे. पण आता या कारची किंमत  ३५ ते ४० लाखांच्या दरम्यान येऊ शकते.

Volvo XC60/XC90 :  Volvo ही युरोपीय कार सर्वाधिक सुरक्षित कार मानली जाते. भारतात  या कारची किंमत ७० लाख ते १.२० कोटी रुपयांपासून सुरू होते. आता एफटीए नंतर यामध्ये ३० ते ४५ टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते आणि नवीन किंमत घटून ५० ते ८० लाख रुपये होऊ शकते.

सगळ्यात फायदेशी म्हणजे  Mini Cooper ही कार आता आणखी स्वस्त होणार आहे.  Mini Cooper S / Countryman या दोन कार सध्या भारतात विकल्या जातात.  Mini Cooper ची  किंमत भारतात ४५ लाख ते  ५८ लाख इतकी आहे. पण आता या  करारानंतरची किंमत ३८ ते  ४८ लाख इतकी होणार आहे. म्हणजे,  ७ ते १० लाख रुपये बचत होणार आहे.

मराठी बातम्या/ऑटो/

Fortuner कुठे घेता आता? 27 दिवसांनी स्वस्तात मस्त Audi आणा घरी, भारत-UK करारामुळे किंमत होणार कमी!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *