Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही


धाराशिव : राज्यातील शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाच्या खासदारांच्या मतदारसंघातून ऑपरेशन टायगर दिल्लीपर्यंत पोहोचलं असून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेतील बंडानंतर, निवडणूक प्रचारावेळी, काहीही झालं तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहू अशा आणाभाका घेणाऱ्या खासदारांनी आता त्यांची साथ सोडली आहे. त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचेही नाव पुढे आल्यानंतर त्यांना राज्यभरातून ट्रोल केलं जात आहे. त्यांचे काही जुने व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. आता, ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांनी ऑपरेशन टायगरवर पहिली प्रतिक्रिया दिली असून मी पुण्यातच असल्याचं त्यांनी म्हटलं.

राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून मी दिल्लीला गेलो नाही, मी पुण्यातच आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच, 20 तारखेनंतर मी मीडियाला माझी भूमिका सांगणार असल्याचंही त्यांनी म्हटल. त्यामुळे, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या खासदार ओमराजे निंबाळकरांच्या शिंदेसेना प्रवेशाच्या चर्चेला सध्यातरी अल्पविराम मिळाल्याचं दिसून येत आहे.

ठाकरेंच्या 6 पैकी 2 खासदारांच्या सह्याच नाहीत

दिल्लीत सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरसंबंधी अद्यापही संभ्रम असल्याचं चित्र आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी सह्यांचं पत्र दिलं असल्याची चर्चा सुरू असताना ते पत्र किंवा सहा खासदारांचा फोटो मात्र अद्याप समोर आला नाही. त्यामुळे सहापैकी दोन खासदारांनी सह्याच केला नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. तसेच या खासदारांवर सध्या कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका अशा आदेशही देण्यात आला आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडल्याने ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्या सहापैकी दोन खासदार हे अद्यापही आपल्या शिवसेनेसोबत असल्याचा दावा आता ठाकरेंकडून करण्यात येत आहे. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सहा खासदारांच्या सह्या नसल्याचा दावाही ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. 

हेही वाचा

मी जो काही आहे तो उद्धव साहेबांमुळे, केवळ स्वार्थासाठी त्यांना सोडलो तर लोकांशी नजर मिळवू शकणार नाही; ओमराजेंचा जुना व्हिडीओ व्हायरल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *