मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. तेल, इंधनांचे दर, सोने आणि चांदी यांच्या किंमती तर आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट नागरिकांना पुढचे काही दिवस सोने खरेदी करु नका असे आवाहन केले. पण आजचा सोन्याचे दर घसरल्यामुळे सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय करावं?
भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व असलेल्या सोन्याचे दर आज चांगलेच घसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या सोन्याच्या दरात जवळपास 400 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर 4 हजार रुपयांनी घसरले आहेत.
आज 17 जून रोजी जळगावच्या सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 मोजावे लागणार आहेत.
आज 17 जून रोजी एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 57 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सतत वाढत असलेले चांदीचे दर हे चांगलेच घसरले आहेत.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




