India A squad Update : भारत हरला, वैभव सूर्यवंशीचा राडा झाला, BCCI ने तातडीने 23 वर्षांच्या खेळाडूला श्रीलंकेला पाठवलं, नेमकं काय घडलं?


Ashok Sharma added India A squad tri-series : भारत-अ आणि श्रीलंका-अ यांच्यातील तिंरगा-मालिकेच्या सामन्यादरम्यान 15 वर्षांचा युवा भारतीय खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये जोरदार राडा झाला. मैदानावर स्लेजिंग आणि बाचाबाची इतकी वाढली की वैभवने श्रीलंकेच्या एका खेळाडूला थेट धक्का दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून क्रिकेट विश्वात यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. बीसीसीआय यावर काही कडक कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादग्रस्त सामन्यात इंडिया-अ संघाला सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

BCCI चा मोठा निर्णय; 23 वर्षांच्या खेळाडूला श्रीलंकेला पाठवलं

या सर्व गदारोळाच्या दरम्यान 16 जून रोजी बीसीसीआयने अचानक एक मोठी घोषणा केली. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या 23 वर्षांच्या अशोक शर्मा या युवा गोलंदाजाला तातडीने श्रीलंकेला पाठवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, श्रीलंकेत सुरू असलेल्या तिंरगा मालिकेसाठी इंडिया-अ संघात युद्धवीर सिंगच्या जागी अशोक शर्माचा समावेश करण्यात आला आहे.

युद्धवीर सिंगला संघातून बाहेर का केले? 

सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीच्या राड्यामुळे हा बदल झाल्याची चर्चा असली, तरी खरे कारण युद्धवीर सिंगची दुखापत (Injury) हे आहे. 11 जून रोजी क्षेत्ररक्षण करताना आणि 13 जून रोजी गोलंदाजी करताना युद्धवीरच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने तज्ज्ञांचा सल्ला घेतला असता, युद्धवीरच्या उजव्या खांद्याला रोटेटर कफची दुखापत झाल्याचे समोर आले. त्याला आता पूर्णपणे बरे होण्यासाठी ‘बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स’ (CoE) मध्ये रिहॅबिलिटेशन (पुनर्वसन प्रक्रिया) पूर्ण करावे लागेल. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी राजस्थानच्या 23 वर्षीय अशोक शर्माला संधी मिळाली आहे.

भारत-अ संघाचे पुढील समीकरण 

श्रीलंकेविरुद्धचा सामना हरल्यानंतर आता भारतीय संघाचा पुढचा सामना 17 जून रोजी अफगाणिस्तान-अ विरुद्ध होणार आहे. जर भारताने अफगाणिस्तानला पराभूत केले, तर अंतिम सामन्यात (Final) पुन्हा एकदा भारत-अ आणि श्रीलंका-अ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. त्यामुळे हा सामना जिंकणे टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi : भारताच्या खेडेगावातून आलेल्यांकडून काय अपेक्षा…; भरमैदानात वैभवच्या नको त्या कृत्यावर श्रीलंकन टीमच्या सदस्याचे वादग्रस्त वक्तव्य





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *