Sshura and Arbaaz Khan Age Difference: ‘म्हातारा नाहीय, तो विंटेज मॉडेल…’; अरबाज खानपेक्षा 23 वर्षांनी लहान पत्नीचं ट्रोलर्सना भुवया उंचावणारं उत्तर


Sshura and Arbaaz Khan Age Difference: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता अरबाज खान (Bollywood Actor Arbaaz Khan) आणि त्याची पत्नी शूरा खान (Sshura Khan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दबंग भाईजान सलमान खानचा (Salman Khan) भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) म्हणजे, मलायका अरोराचा (Malaika Arora) एक्स-हसबंड. मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजनं शूरासोबतच दुसरं लग्न उरकलं. काही दिवसांपूर्वीच दोघांना एक गोंडस मुलगीसु्द्धा झालीय. आपल्या साऱ्यांनाच ठाऊक आहे की, दोघांच्या वयात खूप मोठं अंतर आहे. यावरुन दोघांना अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. आता पुन्हा एकदा अरबाज खानची पत्नी शूरा खान चर्चेत आली आहे. यावेळीही अरबाज आणि तिच्या वयात असलेलं मोठं अंतर हेच कारण ठरलंय. सोशल मीडियावर या विषयावर अनेकदा चर्चा होतच असतात, अशातच आता शूरानं ट्रोलर्सना दिलेल्या एका उत्तराची जोरदार चर्चा रंगली आहे.  

अरबाज खान यानं शूरा खानशी लग्न केलं असून, त्याच्यात वयाचं मोठं अंतर आहे. या अभिनेता-दिग्दर्शक असलेल्या अरबाजनं 2023 मध्ये शूराशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगीही आहे. अरबाज हा त्याच्या पत्नीपेक्षा साधारणपणे 23 वर्षांनी मोठा आहे. वयातील या अंतरामुळे दोघांनाही अनेकदा ट्रोल केलं जातं. अरबाजनं यापूर्वीही यावर भाष्य केलं आहे आणि अलीकडेच शूरानंही ट्रोलर्सना उत्तर दिलंय.  

Sshura and Arbaaz Khan Age Difference: 'म्हातारा नाहीय, तो विंटेज मॉडेल...'; अरबाज खानपेक्षा 23 वर्षांनी लहान पत्नीचं ट्रोलर्सना भुवया उंचावणारं उत्तर

शूरा खान काय म्हणाली? (Sshura Khan On Arbaaz Khan)

शूरा खाननं काही दिवसांपूर्वी एक ऑनलाईन चॅठ सेशन ठेवलेलं, जिथे चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची तिनं उत्तरं दिली. शूराच्या या ‘सवाल पूछो’ सेशनवेळी एका युजरनं विचारलं की, ‘एका म्हाताऱ्यासोबत तू खूश आहेस?’ या प्रश्नावर शूरानं कोणतेही आढेवेढे न घेता उत्तर दिलं. ती म्हणाली की, “खरंच का? ते म्हातारे नाहीत, ते एक लिमिटेड-एडिशन विंटेज मॉडल आहेत…”

अरबाज आणि शूराच्या मुलीचं नाव कुणी ठेवलं? (Sshura, Arbaaz Khan Daughter Name)

शुरानं इतरही अनेक रंजक प्रश्नांची उत्तरं दिलीत. तिच्या मुलीचं नाव कोणी ठेवलं, असं विचारल्यावर शूरानं सांगितलं की, “सलीम अंकल – म्हणजेच, अरबाज खान यांचे वडील – यांनी तिचं नाव ठेवलंय…” दरम्यान, अरबाज आणि शूरा यांच्या मुलीचे नाव ‘सिपारा अरबाज खान’ असं आहे. 

Sshura and Arbaaz Khan Age Difference: 'म्हातारा नाहीय, तो विंटेज मॉडेल...'; अरबाज खानपेक्षा 23 वर्षांनी लहान पत्नीचं ट्रोलर्सना भुवया उंचावणारं उत्तर

अरबाजसोबतच्या पहिल्या ‘डेट’बाबतही खुलासा

एका चाहत्यानं शुराला विचारले की, “तू अरबाजसोबत पहिल्या ‘डेट’वर जाण्याचं का मान्य केलेलंस?” त्यावर शुरानं उत्तर दिलं की, “मी त्याच्यासोबत लावलेली एक पैज हरले होते, त्यामुळे मला त्याला डिनरसाठी घेऊन जावं लागलं…” दुसऱ्या एका युजरनं तिच्या सध्याच्या व्यवसायाबद्दल विचारलं, तेव्हा शूरानं सांगितलं की, “गृहिणी. पूर्णवेळ आई आणि पत्नी…” 

दरम्यान, मातृत्वाबाबत विचारलं असता, शुरानं त्याचे वर्णन “एक जादुई प्रवास…” असं केलंय. जिथे ती एकाच वेळी थकते आणि मजाही करते, तसेच जिथे तिला दर 12 सेकंदांनी हाक मारली जाते. एका युजरनं टिप्पणी केली की, “तुझं वजन थोडं वाढलं आहे…” त्यावर शुरा हसली आणि तिनं लिहिलंय की, “थोडंसं? माझं वजन 20 किलोनं वाढलंय…”

शूरा खान कोण? (Who Is Sshura Khan)

अरबाज खानचं पहिलं लग्न 1994 मध्ये अभिनेत्री-मॉडेल मलायका अरोरा हिच्याशी झालेलं, दोघांना अरहान खान नावाचा एक मुलगा आहे. मात्र, 2017 मध्ये या जोडप्यानं घटस्फोट घेतला. त्यानंतर अरबाज खानच्या आयुष्यात शूरा आली आणि 2023 मध्ये दोघांनी लग्न केलं. शुरा खान ही एक व्यावसायिक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट असून तिनं प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगा राशा थडानी यांच्यासोबत काम केलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Govinda Wife Sunita Ahuja Property: ना सुपरस्टार पती, ना मुलं… मग गोविंदाची पत्नी कुणाच्या नावावर करणार कोट्यवधींची संपत्ती? सुनीता अहुजाच्या उत्तरानं सारेच हैराण

ABP Majha च्या बातम्या LIVE: 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *