मुंबई: राज्यात राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू असून शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) ऑपरेशन टायगर जोर धरत आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 खासदार शिवसेनेत दाखल होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच, 16 आमदार आणि 7 खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) अंतिम बोलणी झालीय, केवळ पक्षप्रवेश तारीख निश्चित करायचं राहिलंय, असा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केलाय. त्यामुळे, पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आहे. विशेष म्हणजे, ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे एकनिष्ठ खासदार आमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) हेही फुटणार असल्याची चर्चा आहे.
ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाल्याने शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला प्रत्यक्ष केवळ 4 खासदार उपस्थित होते. तर, इतर 5 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामध्ये, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही ऑनलाईन हजेरी लावल्याचं सांगण्यात आलं. विशेष म्हणजे, ज्यांनी ऑनलाईन हजेरी लावली त्यांना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी तसा कुठलाही प्रयत्न न केल्याने ओमराजे निंबाळकर हेही ठाकरेंची साथ सोडण्याच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे.
ठाकरेंच्या बैठकीला तिसऱ्यांदा अनुपस्थिती
ओमराजेंनी गेल्या अनेक वर्षांपासून ते उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. मात्र, ठाकरेंनी बोलवलेल्या गेल्या दोन बैठकांना ओमराजेंची अनुपस्थितीत होती, तर कालच्याही बैठकीला ओमराजेंनी कौटुंबिक कारण देत ते उपस्थित राहिले नाहीत. विशेष म्हणजे दोन दिवसांत त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्यामुळे, हा निकाल नेमका कोणाच्या बाजुने लागतो, काय लागतो यावरही त्यांच्या प्रवेशाची गणितं अवलंबून असू शकतात. कारण, ओमराजेंसारखा निकाल लागला तर ते शिंदेंसोबत येऊ शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ते उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार आहेत हेही विसरता येणार नाही.
ओमराजेंच्या चर्चेनं अनेकांच्या भुवया उंचावल्या
ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी भाजप महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गद्दार गद्दार म्हणून टीका केली होती, तर आपण ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही, आपण मंत्रिपदाची ऑफर नाकारल्याचंही ते सांगत होते. मात्र, आता त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दिल्लीत होणार ऑपरेशन टायगर
ऑपरेशन टायगर हे मुंबईत होणार नसून दिल्लीत होणार आहे. नियमांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत ऑपरेशन टायगर लांबणीवर पडलं आहे. कारण, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांप्रमाणे ठाकरेंच्या खासदारांचा गट तयार झाल्यानंतर दोन तृतिअंश संख्याबळ असणे आवश्यक आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील खासदारांपैकी 5 खासदार भूमिका घेण्यासाठी तयार असून एका खासदारामुळे हे अडलय का?, ऑपरेशन टायगर हे गणितात अडकलंय का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेना वर्धापन दिन किंवा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त
शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत ऑपरेशन टायगर ही मोहीम फत्ते केली जाऊ शकते किंवा, पावसाळी अधिवेशनावेळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, तेव्हा ऑपरेशन टायगरचा मुहूर्त लागू शकतो, अशी माहिती आहे. परभणीचे खासदार बंडू जाधव, यवतमाळचे संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांचंही नाव या यादीत घेतलं जात आहे. विशेष म्हणजे, कालच्या मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीलाही ओमराजे निंबाळकर गैरहजर होते. त्यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिलं नाही, त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.
नवीन गट स्थापन करावा लागणार
फुटलेल्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडे जाऊन नवीन गट स्थापन केल्याचं आणि ठाकरे पक्ष सोडल्याचं पत्र द्याव लागणार आहे. तसेच, एकूण खासदारांच्या दोन तृतिअंश खासदारांचे संख्याबळ म्हणजेच 9 पैकी 6 खासदारांचा गट असणे गरजेचं आहे. फुटलेला गट स्वतंत्र न राहता शिंदेंच्या शिवसेनेत त्याचे विलिनीकरण होईल.
हेही वाचा
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी