Last Updated:
Nalasopara Crime News : नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथं आरोपीने असं काही केलं आहे की महिला पूर्ण पणे घाबरुन तिने पोलीस ठाणे गाठले आहे. नक्की काय घडलं आणि कशावरुन झालं त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
नालासोपारा : नातेसंबंधांतील तणाव,गैरसमज आणि अनेकदा वैयक्तिक वाद हे कधी गंभीर वळण घेतात हे सांगता येत नाही. नालासोपाऱ्यातही घडलेल्या अशाच एका प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून या प्रकरणानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई सुरु केलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व धक्कादायक प्रकार प्रगतीनगर येथील एका परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. पण या घटनेच आरोपी व्यक्तीचे एका महिलेसोबत जवळचे संबंध असल्याची माहिती त्याच्या पत्नीला मिळाली होती. ही माहिती संबंधित पीडित महिलेने आरोपीच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी दिल्याचा संशय आरोपीला आलेला होता.
खरं तर याच कारणावरुन आरोपी हा अनेक दिवसांपासून पीडित महिलेवर नाराज होता. या दरम्या घटनेच्या दिवशी आरोपी आणि पीडीत महिला यांच्यात याच कारणावरुन टोकाचा वाद झाला. पाहता पाहता हा वाद इतका वाढला की आरोपीने महिलेला थेट अश्लील भाषेतच शिवीगाळ केली यावर तो थांबला नाही तर त्याने असं काही केलं की सर्वांच्या पायाखालची जमिनीच सरकते.
दोघांमध्ये वाद सुरु असताना आरोपीने गुटखा खाल्ला होता आणि त्याच्या तोडांतील गुटख्याचे थेंब महिलेच्या अंगावर उडाले. त्यामुळे महिलेने त्याला दूर करण्याचा प्रयत्न सुरुवातीस केला. पण महिलेने आपल्याला दूर लोटले याचा राग आरोपीला अधिकच आला आणि तो ज्यास्तच आक्रमक झाला.
धक्कादायक म्हणजे आरोपीने थेट महिलेला हात जबरदस्ती पडकला आणि तिला स्वत:कडे जोरात ओढले. यात कृतीमुळे महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे. घडलेल्या अशा प्रकारामुळे महिला अत्यंत घाबरली आणि तिने तातडीने तुळीज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी आरोपीविरोद्धात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.
Mumbai,Maharashtra
तिने गुपित बाहेर काढले अन् आरोपीतील नराधम जागा झाला; आधी गुटखा खाल्ला मग नंतर ते केलं भयकंर
