रेखा यांना विश्वासात न घेता हा सीन शूट केला असेल, तर कुठल्याही युवा अभिनेत्रीसाठी हा धक्कादायक अनुभव आहे, ती त्रस्त होणं स्वाभाविक आहे. एकतर माझ्या वडिलांनी हा सीन शूट करायला नकार द्यायला हवा होता, किंवा आधी रेखाची परवानगी घ्यायला हवी होती, असं पल्लवी चटर्जी यांनी म्हटलं आहे.
विक्की लालवानी यांच्याशी बोलताना पल्लवी म्हणाली की, त्या काळात डायरेक्टर कलाकारांना पूर्ण कल्पना नाही द्यायचे. कारण त्यांना कॅमेऱ्यावर खऱ्याखुऱ्या Reaction लागायच्या. कुठल्याही मुलीला न सांगता काही मिनिटं असा किसिंग सीन तिच्यासोबत शूट केला, तर तिला धक्का बसणं स्वाभाविक आहे.
रेखा त्यावेळी वयाने लहान होत्या. जेव्हा तुम्ही वयाने इतके लहान असता, तुम्हाला कल्पना नसताना तुमच्यासोबत असं होतं. तेव्हा तुम्ही विरोधही करु शकत नाही. पल्लवीचं असं म्हणणं आहे की, त्यावेळी असं झालं असेल तर ते डायरेक्टरच्या मंजुरीशिवाय होऊ शकत नाही.
पल्लवीने आपल्या वडिलांचा बचाव सुद्धा केला. बिस्वजीत यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. पण त्यांच्याबाबतीत कधी कोणी अशी तक्रार केली नाही.
पल्लवी म्हणाली की, माझे वडिल महिलांचा भरपूर आदर करायचे. जर, एखादी महिला रुममध्ये आली, तर ते उभं राहून तिचं स्वागत करायचे. जे काही झालं, त्यात फक्त माझे वडिल सहभागी होते असं मला वाटतं नाही.




