Trinamool Congress Crisis: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे बंगाल प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी टीएमसीच्या बंडखोर गटाच्या खासदारांनी भेट घेतली. या बैठकीला खासदार सायनी घोष आणि प्रसून बॅनर्जी यांच्यासह अनेक टीएमसी खासदार उपस्थित होते. भाजप खासदार निशिकांत दुबेही उपस्थित होते. दिल्लीत पोहोचल्यावर सायनी घोष म्हणाल्या, “मी सध्या काहीही बोलणार नाही. योग्य वेळ आल्यावरच मी बोलेन.” ममता बॅनर्जी यांनी सायनी आणि माला यांना पक्षाच्या पदांवरून हटवले आहे. सायनी या पक्षाच्या युवा शाखेच्या अध्यक्ष होत्या. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षातील बंडखोर खासदार उद्या (ता.15 जून) सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेणार आहेत. बंडखोर खासदार काकोली घोष यांनी दावा केला आहे की, त्यांना आता 22 खासदारांचा पाठिंबा आहे. यापूर्वी, काकोली यांनी 20 खासदारांच्या पाठिंब्याचा दावा केला होता. त्यानंतर, 19 खासदारांच्या स्वाक्षरीचे एक पत्र समोर आले. टीएमसीचे लोकसभेत एकूण 28 खासदार आहेत. याव्यतिरिक्त, त्यांच्या 13 राज्यसभा खासदारांपैकी चौघांनी राजीनामा देऊन पक्ष सोडला आहे.
आजच्या मोठ्या घडामोडी
- सयोनी घोष आणि माला रॉय रविवारी कोलकाताहून दिल्लीत दाखल झाल्या.
- बंडखोर खासदार जगदीश बसुनिया म्हणाले की, त्यांचा गट सोमवारी लोकसभा अध्यक्षांची भेट घेईल.
- काकोली घोष दस्तीदार यांचे पुत्र, बैद्यनाथ यांनी ममता बॅनर्जी, महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी बारासात विधानसभा मतदारसंघातून स्वतःसाठी किंवा त्यांच्या आईसाठी कधीही तिकीट मागितले नाही.
ते फुटलेले खासदार कोण?
| लोकसभा मतदारसंघ | खासदार | लोकसभा मतदारसंघ | खासदार |
| बारासात | काकोली घोष दस्तीदार | घाटाल | दीपक अधिकारी (देव) |
| कूचबिहार | जगदीश चंद्र बसुनिया | झाडग्राम | कालीपद सोरेन |
| जांगीपूर | खलीलुर रहमान | मेदिनीपूर | जून मालिया |
| बहरामपूर | युसूफ पठाण | बांकुडा | अरूप चक्रवर्ती |
| मुर्शिदाबाद | अबू ताहेर खान | बर्धमान पूर्व | डॉ. शर्मिला सरकार |
| बॅरकपूर | पार्थ भौमिक | हावडा | प्रसून बॅनर्जी (बंधोपाध्याय) |
| मथुरापूर | बापी हलदार | बोलपूर | असित कुमार माल |
| जादवपूर | सायोनी घोष | बीरभूम | शताब्दी रॉय |
| कोलकाता दक्षिण | माला रॉय | हुगळी | रचना बॅनर्जी |
| आरामबाग | मिताली बाग |
राजकीय पक्षात स्वतंत्र गट स्थापन करण्याचे नियम
- पक्षांतरबंदी कायद्यानुसार (10 वी अनुसूची), पक्षाच्या किमान दोन-तृतीयांश आमदारांचा किंवा खासदारांचा पाठिंबा असेल तरच स्वतंत्र गटाला मान्यता दिली जाते. टीएमसीच्या बाबतीत सध्याची हीच परिस्थिती आहे…
- विधानसभेत, ममता बॅनर्जींच्या 80 आमदारांपैकी 58 आमदारांनी पक्षांतर केले आहे. याचा अर्थ बंडखोर गटाला दोन-तृतीयांश पाठिंबा आहे.
- लोकसभेत, 28 पैकी 20 खासदारांनी बंड केले आहे. याचा अर्थ बंडखोर गटाला दोन-तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत आहे.
- दोन-तृतीयांश सदस्य दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात किंवा स्वतंत्र गट स्थापन करून मान्यता मिळवू शकतात.
- अंतिम निर्णय विधानसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती घेतात. तथापि, ममता गट या संपूर्ण प्रकरणाला न्यायालयात आव्हान देऊ शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप