वुमन्स टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात यश मिळवलं आहे. भारतीय महिला संघाने या स्पर्धेतील सहाव्या आणि आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला 64 धावांनी लोळवलं. भारतीय गोलंदाजांनी 171 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला 17 ओव्हमध्ये 106 रन्सवर ढेर केलं. दीप्ती शर्मा हीने बॉलिंगने टीम इंडियाच्या विजयात सर्वाधिक योगदान दिलं. दीप्तीने पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्स मिळवल्या. दीप्तीची टी 20i क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ ठरली. दीप्तीने यासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. दीप्ती टी 20i क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली आहे.