Krushnaichya Leki: 22व्या वर्षी झी मराठीवर मोठी संधी; निवेदिता सराफ यांच्या मालिकेत साईदत्त साकारणार ‘ही’ भूमिका


Krushnaichya Leki Serial: ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांची मध्यवर्ती भूमिका असलेली ‘कृष्णाईच्या लेकी’ (Krushnaichya Leki) ही मालिका लवकरच ‘झी मराठी’वर (Zee marathi) प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेच्या निमित्तानं साईदत्त बाली या तरुण अभिनेत्याला ‘झी मराठी’च्या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळालीये. 

‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत साईदत्तला कृष्णाईच्या सावत्र लेकाची म्हणजे जीत ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे.  कृष्णाईच्या मध्यवर्ती भूमिकेत निवेदिता सराफ आहेत. अभिनेत्री साक्षी गांधी ही साईदत्तच्या सख्ख्या आईच्या आणि अभिनेते संजय कुलकर्णी त्याच्या वडीलांच्या भूमिकेत आहेत. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी झी मराठीवर एवढ्या अनुभवी कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यानं साईदत्त भारावून गेला आहे.

साईदत्तची मनातील भावना, मालिकेबद्दल नेमकं काय म्हणाला? (Sai Datt Bali debut in Krushnaichya Leki)

‘ही भूमिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मला ‘झी मराठी’वर काम करण्याची पहिली संधी मिळाली, हे माझं भाग्य’, असं साईदत्त अभिमानानं सांगत होता. ‘सोनी मराठी’वर कारण गुन्ह्याला माफी नाही, ‘स्टार प्रवाह’वर अबोली, ‘कलर्स’वर बाळूमामाच्या नावानं चांगभलं आणि ‘सन मराठी’वर संसार माझा रेखिते या मालिकांमधून साईदत्तनं आपल्या अभिनयाची छाप सोडलीये. 

‘कृष्णाईच्या लेकीसाठी ऑडिशनची ऑफर आली आणि स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली’, असं त्यानं सांगितलं. पूजा कुलकर्णी यांनी जीत या व्यक्तिरेखेची दिलेली कल्पना आणि ते साकारण्याच्या दृष्टीनं दिलेली दिशा याबद्दल साईदत्त त्यांचे खूप आभार मानतो. आपल्यासाठी ही ऑडिशन आव्हानात्मक होतीच, पण त्यातून खूप काही शिकायलाही मिळालं, असंही तो सांगतो.

साईदत्त बाली हा मूळचा प्रभादेवीचा हरहुन्नरी कलाकार. दादरच्या कीर्ती कॉलेजनं त्याच्या गुणवत्तेला खऱ्या अर्थानं पैलू पाडले. पण साईदत्तला अभिनयाची आवड ही बालपणापासूनच होती. त्या वयापासूनच नाना पाटेकर यांच्या अभिनय शैलीचा त्याच्यावर प्रभाव होता. तो कळत नकळत त्यांच्या संवादफेकीची, त्यांच्या आवाजाची नक्कल करू लागला. तिथंच त्याच्यातला मिमिक्री आर्टिस्ट घडू लागला. नाना पाटेकरांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करता करता साईदत्त वीसेक नामवंत अभिनेत्यांच्या आवाजात मिमिक्री करू लागला.

साईदत्तला या प्रवासात त्याच्या आईची लाभली मोलाची साथ (Sai Datt Bali role in Zee Marathi show)

साईदत्तला या प्रवासात त्याच्या आईची मोलाची साथ लाभली. तिनं त्याच्यातल्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि त्याला प्रोत्साहनही दिलं. त्यामुळंच त्याची अभिनयक्षेत्राची आवड वाढत गेली. आधी एकांकिका, मग एकपात्री प्रयोग आणि त्यानंतर नाटकं करता करता साईदत्तला टेलिव्हिजन मालिकांमधून काम करण्याची संधी मिळाली. कलाक्षेत्रात रोज रोज छोटी छोटी शिखरं चढत असताना साईदत्तनं शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. तो दादरच्या कीर्ती कॉलेजात पदवीच्या दुसऱ्या वर्षाला आहे. आयुष्यात शिक्षण आणि शूटिंग यांचा समतोल साधण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

अभिनेते रोहित परशुराम यांनी अनेक बारीकसारीक गोष्टी समजावून दिल्या, दिग्दर्शक अनिकेत साने, विशाल कुंभार आणि अमित पारकर यांनी वेळोवेळी पाठीवर विश्वासाचा हात ठेवला. त्यामुळं सुरुवातीचं दडपण कधीच दूर झालीय आणि आता नवनवीन गोष्टी शिकायला खूप मजा येतेय, असं साईदत्त सांगतो.

एकीकडे कॉलेजचं शिक्षण आणि दुसरीकडे अभिनयाचं शिक्षण करत करत साईदत्त बालीचा मनोरंजनविश्वातला प्रवास आता एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. अजून त्याला खूप मोठा पल्ला गाठायचाय. पण जन्मदात्या आईचं प्रोत्साहन आणि कीर्ती कॉलेजनं दिलेल्या आत्मविश्वासाचं बळ गाठीशी घेऊन साईदत्त बाली त्या मोहिमेवर निघालाय.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात…पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *