Somvati Amavasya 2026 : सोमवती अमावस्येला जुळून येतायत 4 शुभ योग; 16 जूनपासून ‘या’ राशींचं नशीब पालटणार, पदरात फक्त पुण्यच


Somvati Amavasya 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्याचं राशी परिवर्तन ही ज्योतिष शास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. 15 जून 2026 रोजी म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजून 53 मिनिटांनी सूर्य देव वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रह 16 जुलै 2026 च्या रात्री याच राशीत विराजमान असणार आहे. सूर्याचं हे संक्रमण देशभरात सर्व 12 राशींच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे. 

त्रिग्रही आणि बुधादित्य योगाचा विशेष संयोग 

ग्रहांच्या या संक्रमणाच्या दरम्यान अवकाशात ग्रहांच्या स्थिती एक दुर्लभ बदल पाहायला मिळणार आहे. मिथुन राशीत सूर्याचा प्रवेश करताच या ठिकाणी आधीपासूनच बुध ग्रहाबरोबर युती होऊन बुधादित्य योग निर्माण होणार आहे. त्याचबरोबर, चंद्राच्या स्थितीसह या काळात विशेष त्रिग्रही प्रभाव देखील जुळून येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, बुधादित्य योग बुद्धी, यश , करिअर आणि आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. 

‘या’ राशींच्या लोकांना मिळणार विशेष लाभ 

सूर्याचं हे संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी शुभ परिणामकारक ठरणार आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्यशाली ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती पाहायला मिळेल. तसेच, नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. तसेच, या कालावधीत तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्हाला शत्रूवर विजय मिळवता येईल. नवीन संपर्क निर्माण होतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी ग्रहांचा शुभ योग लाभदायी छरणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगतीचे अनेक संकेत मिळती. तुमच्या पदोन्नतीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी ग्रहांच्या संक्रमणाचा काळ भाग्यशाली ठरणार आहे. या कालावधीत तुम्ही नवीन सरकारी योजनांचा लाभ घ्याल. राजकीय क्षेत्रात तुम्ही फार सक्रिय असाल. नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी वाढतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :    

Somavati Amavasya 2026 : तब्बल 30 वर्षांनंतर सोमवती अमावस्येला दुर्मिळ योग; अमावस्येच्या दिवशी ‘या’ 5 गोष्टी नक्की करा, घरात येईल लक्ष्मी  



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *