BAN vs AUS : ऐतिहासिक, बांगलादेशने सलग दुसऱ्या विजयासह मालिका जिंकली, ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने धुव्वा – Marathi News | Ban vs aus bangladesh won 2nd consecutive match and clinch odi series against australia


बांगलादेश क्रिकेट टीमने मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध इतिहास घडवला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकला आहे. बांगलादेशने यासह एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. बांगलादेशने पावसाने प्रभावित झालेल्या या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर डीएलएसनुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. बांगलादेशने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. मुस्तफिजूर रहमान हा बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला. मुस्तफिजूर रहमान याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या दुसऱ्या सामन्यात नक्की काय झालं हे सविस्तर जाणून घेऊयात.

बांगलादेशच्या गोलंदांजांचा धमाका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाला 200 धावांचा आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. धक्कादायक म्हण्जे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

मॅथ्यू शॉर्ट याने झिरोवर आऊट होण्याची हॅट्रिक केली. तसेच कूपर कॉनोली आणि मॅट रेन्शा हे दोघेही आले तसेच माघारी परतले. बांगलादेशने त्यानंतर आणखी 2 झटके दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 5 आऊट 65 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर झेव्हीयर बार्टलेट आणि मार्नस लबुशेन या दोघांनी अर्धशतकी खेळी करुन ऑस्ट्रेलियाची लाज राखली. दोघांच्या अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला तिहेरी आकडा गाठता आला.

मार्नस आणि झेव्हीयरची अर्धशतकी खेळी

ऑस्ट्रेलियासाठी मार्नस लबुशेन याने याने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर झेव्हीयर बार्टलेट याने 52 धावांची निर्णायक खेळी केली. जोश इंग्लिस याने 34 आणि कमॅरुन ग्रीन याने 25 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पावसाने प्रभावित झालेल्या 42 षटकांच्या सामन्यात 8 विकेट्स गमावून 187 धावा करता आल्या. बांगलादेशसाठी तस्कीन अहमद आणि मुस्तफिजूर रहमान या दोघांनी कडक बॉलिंग केली. अहमद आणि रहमान या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर तन्वीर इस्माल याने दोघांना आऊट केलं.

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

बांगलादेशच्या बॅटिंगदरम्यानही पावसाने खोडा घातला. त्यामुळे बांगलदेशला 41 ओव्हरमध्ये 192 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. बांगलादेशने हे आव्हान 36 बॉलआधी आणि 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. बांगलादेशने 35 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 195 धावा केल्या आणि सामना जिंकला.

बांगलादेशसाठी सौम्य सरकार,नजमुल हुसैन शांतो आणि तॉहीद हृदॉय या तिघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सौम्यने 42 आणि शांतोने 41 धावा केल्या. लिटन दास 21 आणि मोसाद्देक हौसेन याने 15 रन्स केल्या. तर मेहदी हसन मिराज आणि तॉहीद हृदॉय या दोघांनी उर्वरित धावा करुन बांगलादेशला विजयापर्यंत पोहचवलं. तॉहीदने 55 बॉलमध्ये नॉट आऊट 40 रन्स केल्या. तर मेहदीने नाबाद 22 धावांचं योगदान दिलं. तर ऑस्ट्रेलियासाठी झेव्हीयर बार्टलेट, रिले मेरडीथ, एडम झॅम्पा, मॅट रेनशॉ आणि कॅमरुन ग्रीन या 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *