US Iran Peace Deal नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध 28 फेब्रुवारीला सुरु झालं होतं. या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगभर झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी शांतता करारावर आज स्वाक्षरी होऊ शकते. दुसरीकडे पाकिस्तानकडून देखील अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं. पुढील 24 तासांमध्ये यावर दोन्ही देशांचे प्रतिनिधी स्वाक्षरी करु शकतात, असा दावा पाककडून करण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले करारावर स्वाक्षरी उद्या होणार आहे. करावर सही झाली की होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली जाणार आहे. .”
इराणची वेगळीच भूमिका
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर इराणच्या विदेश मंत्रालयानं वेगळीच भूमिका मांडली. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघेई यांनी रविवारी कोणत्याही करारावर स्वाक्षरी होणार नसल्याचं म्हटलं. रविवारी करारावर स्वाक्षरी झाली नाही तर येत्या काळात त्यासंदर्भात प्रगती दिसेल असं देखील इस्माइल बाघेई म्हणाले. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर 24 तासात स्वाक्षरी होऊ शकते असा दावा केला. पाकिस्तानकडून अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी केली जाते.
इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी देखील शुक्रवारी येत्या काही दिवसांमध्ये करारावर स्वाक्षीरी होऊ शकते म्हटलं होतं. तर दुसरीकडे एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यानं करार होण्याची शक्यता 80 ते 85 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचं म्हटलं.
होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाचा मुद्दा
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाचा आणि तणावाचा मुद्दा बनला आहे. गेल्या काही महिन्यांपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक बंद असल्यानं जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
एप्रिलमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये दीर्घकालीन शांतता कराराबाबत अनेकदा चर्चा झाल्या मात्र आतापर्यंत ठोस परिणाम दिसून आले नाहीत. ट्रम्प यांनी अनेकदा करार अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं मात्र चर्चा लांबल्या होत्या.
अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील लष्करी तणाव या आठवड्यात पुन्हा वाढला होता. यामुळं पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होते काय अशी भीती निर्माण झाली होती. 28 फेब्रुवारीला युद्ध झाल्यानंतर 7 एप्रिलला शस्त्रसंधी झाली होती. त्यानंतर आतापर्यंत छोटे मोठे हल्ले प्रतिहल्ले देखील धाल्याचं पाहायला मिळालं होतं.
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या