Jain Community White Line Controversy Mumbai Road: दादर पश्चिम येथील डी. एस. बाबरेकर मार्ग आणि गोखले मार्ग परिसरात जैन धर्मगुरूंच्या मार्गक्रमणासाठी रस्त्यांवर पांढऱ्या रंगांच्या पट्ट्या ( Jain Community White Line Controversy) मारण्यात आल्या होत्या. सदर प्रकरणानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काल आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी स्थानिक मराठी नागरिक आणि जैन मुनी यांच्यात शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली.
रंगविण्यात आलेले पांढरे पट्टे तातडीने हटवावेत अन्यथा मनसे कार्यकर्ते स्वतः कारवाई करतील, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. त्यांना जैन समाजानेही प्रत्युत्तर दिल्याने येथील वातावरण तणावपूर्ण झाले. हा वाद चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित रस्त्यांवरील पांढरे पट्टे थिनरच्या सहाय्याने पुसून ते हटविण्याची कारवाई केली. (Jain Community White Line Controversy Mumbai Road)
अरे ए….आवाज खाली…जैन मुनी मराठी महिलेवर संतापले- (Jain Community White Line Controversy Mumbai Road)
दादरमधील पांढऱ्या पट्ट्यांवरुन घेतलेल्या मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर जैन मुनी माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी जैन मुनी आणि स्थानिक मराठी महिला यांच्यात शाब्दिक चकमक झाली. जैन मुनी कॅमेऱ्यासमोर बोलायला आले. त्यावेळी काही महिला आपले मुद्दे मांडत होत्या. त्याचवेळी जैन धर्मगुरुचा आवाजाचा पार चढला. अरे ए आवाज खाली…असं यावेळी जैन मुनी म्हणाले. जैन मुनींचा सदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत- जैन मुनी निलेशचंद्र (Jain Community White Line Controversy)
संदीप देशपांडेंच्या भूमिकेवर जैन धर्मगुरु निलेश चंद्र मुनी (Nileshchandra muni) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. संदीप देशपांडे दोन समाजामध्ये दरी निर्माण करत आहेत, जैन समाज शांतता प्रिय आहे, याचा अर्थ जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत. पण, जैन समाजाला मी आवाहन करतो की, तुम्ही शांतता राखा जास्त विरोध करू नका, असे जैन धर्मगुरु निलेश चंद्र मुनींनी म्हटलं आहे. संदीप देशपांडे बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जात असतील तर, बाळासाहेब ठाकरे यांनी जैन, मारवाडी लोकांवर प्रेम केलं, त्यांनी कुठलाही त्रास दिला नाही, अशी आठवण निलेश चंद्र मुनींनी करुन दिली.
महापालिकेकडून तात्काळ रस्त्यांवरील पांढरे पट्टे हटवण्याचे काम हाती- (Jain Community White Line Controversy Mumbai Road)
पांढऱ्या पट्ट्यांवरुन संदीप देशपांडेंनी इशारा दिला होता. काल दुपारी 3 वाजेपर्यंत दादरमधील पांढरे पट्टे हटवण्यात यावे…अन्यथा आम्ही पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारु, असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला. संदीप देशपांडेंच्या या इशाऱ्यानंतर महापालिकेकडून तात्काळ रस्त्यांवरील पांढरे पट्टे हटवण्याचे काम हाती घेण्यात आले. महानगरपालिकेचे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले आणि लगेच पांढऱ्या पट्टीचा रंग काढण्याचे काम हाती घेतले होते.
संबंधित बातमी:
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या