Nothing फोन 4a आणि फोन 4a प्रो स्मार्टफोन महागला, नवी किंमत काय ? – Marathi News | Nothing Phone 4a and Phone 4a Pro smartphones have become expensive know the new price


Nothing कंपनीने पुन्हा एकदा Phone 4a आणि Phone 4a प्रो च्या किमतीत वाढ केली आहे. दोन महिन्यांत ही कंपनीची दुसरी दरवाढ आहे. कंपनीने ऑफलाइन रिटेल स्टोअर्सना पाठवलेल्या अधिकृत संदेशातून याची पुष्टी केली आहे. त्यानुसार प्रो व्हेरिएंट 5 हजार रूपयांनी, तर स्टँडर्ड (म्हणजेच 4a) व्हेरिएंट 3 हजार रूपयांनी महाग झाले आहे. मात्र कंपनीने या दरवाढीचे नेमकं कारण उघड केलेले नाही, परंतु सध्या रॅम आणि स्टोरेजच्या कमतरतेमुळे जगभरात मेमरीच्या किमती वाढत असल्याने ही दरवाढ झाली असावी अशी अपेक्षा सर्वत्र होत आहे. चला तर मग दरवाढीनंतर नथिंग फोन 4a आणि प्रो व्हेरिएंटची किमती किती आहे ते जाणून घेऊयात.

भारतात नथिंग फोन 4a प्रो ची किंमत

नथिंग फोन 4a प्रो हा हँडसेट तीन व्हेरिएंटमध्ये येतो आणि तिन्हीच्या किमतीत 5 हजार रूपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे आता बेस व्हेरिएंटची किंमत 50 हजार रूपयांच्या पुढे गेली आहे. मार्चमध्ये हा फोन 39 हजार 999 रूपये किमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र लाँच झाल्यापासून आतापर्यंत एकूण या फोनमध्ये 10 हजार रूपयांची वाढ झाली आहे.

या फोनचा 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट आता 44 हजार 999 ऐवजी 49 हजार 999 ला, 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट 47 हजार 999 रूपयांन ऐवजी 52 हजार 999 इतकी झाली आहे आणि 12GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट 50 हजार 999 रूपयांऐवजी 55 हजार 999 रूपये किंमतीत उपलब्ध झाला आहे. स्पर्धेच्या बाबतीत हा नथिंग फोन iQOO 15R, OPPO Reno 15 आणि OnePlus 15R सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल.

भारतात नथिंग फोन 4a ची किंमत

एका रिपोर्टनुसार, हा फोन 31 हजार 999 रूपयांमध्ये लाँच झाला होता, पण आता त्याच्या किंमतीत 6 हजार रूपयांची वाढ झाली आहे. यावेळी फोन 3 हजार रूपयांनी महाग झाला आहे. 8जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंट पूर्वी 34 हजार 999 मध्ये उपलब्ध होता, पण आता हा फोन 37 हजार 999 मध्ये उपलब्ध होईल.

8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट पूर्वी 37 हजार 999 रूपयांना उपलब्ध होता, पण आता हाच फोन 40 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. तर यातील 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेला टॉप-एंड व्हेरिएंट आता 40 हजार 999 रूपयांऐवजी 43 हजार 999 रूपये किमतीत खरेदी करता येणार आहे. स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, हा हँडसेट या किंमत श्रेणीतील मोटोरोला एज ७० प्रो आणि विवो व्ही७० एफई सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *