‘या’ स्वस्त किमतीत बीएसएनएलचा 365 दिवसाचा वैधता असलेला प्लॅन, दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग – Marathi News | BSNL plan with 365 days validity 2GB high speed data per day and unlimited calling at this cheap price


सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल त्यांच्या लाखो ग्राहकांना अनेक अत्यंत किफायतशीर प्रीपेड प्लॅन्स देत आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता कंपनी नवनवीन प्लॅन लाँच करत असते. जेणेकरून वापरकर्त्यांना त्याचा पुरेपुर लाभ घेता येईल तसेच इतर ग्राहक वर्ग सुद्धा या स्वस्त परवडणाऱ्या प्लॅनकडे आकर्षित होतात. तर बीएसएनएल ही कंपनी केवळ मासिक प्लॅन्सद्वारेच नव्हे, तर दीर्घकालीन प्रीपेड प्लॅन्सद्वारेही खासगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे आता कंपनीने 2 हजार 399 रुपयांचा एक प्रीपेड प्लॅन देत आहे, ज्याची वैधता दीर्घ आहे.

या प्लॅनमध्ये पूर्ण 365 दिवसांची वैधता असून, डेटा, कॉलिंग आणि एसएमएससारखे विविध फायदे मिळतात. ज्या वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास टाळायचा असेल त्यांच्यासाठी हा प्लॅन एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग या स्वस्त 3‍65 दिवसांची वैधता असलेल्या प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.

बीएसएनएलच्या 2 हजार 399 रुपयांच्या प्लॅनचे फायदे

2 हजार 399 रुपये किमतीच्या या BSNL प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो. तुम्हाला दररोज 100 SMS सुद्धा मिळतात. या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची वैधता 365 दिवसांची आहे, त्यामुळे तुम्हाला वर्षभर पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.

ही योजना कोणासाठी सर्वोत्तम आहे?

कंपनीचे म्हणणे आहे की, ज्या ग्राहकांना जास्त वैधता कालावधी हवा आहे त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला मासिक रिचार्ज टाळायचा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. वर्षभराच्या वैधतेमुळे, ही योजना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुसरे सिम वापरणाऱ्यांसाठी देखील आदर्श ठरू शकते.

नेटवर्क नक्की तपासा

मात्र कोणताही प्लॅन खरेदी करण्यापूर्वी तुमच्या परिसरात बीएसएनएल नेटवर्कची उपलब्धता आणि इंटरनेटचा वेग नक्की तपासा. बीएसएनएलने गेल्या काही वर्षांत आपल्या 4G नेटवर्कचा वेगाने विस्तार केला आहे, परंतु नेटवर्कचा अनुभव प्रत्येक क्षेत्रानुसार बदलू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *