Last Updated:
मराठा रॉयल्सने हा सामना 8 धावांनी जिंकून टी20 मुंबई लीगच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. खरं तर या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने प्रचंड मेहनत घेऊन टीमला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं होतं.
MSC Maratha Royals vs ARCS Andheri vs Final, T20 Mumbai 2026 : टी20 मुंबई लीगचा फायनल सामना कॅप्टन सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखाली मराठा रॉयल्सने जिंकला आहे. मराठा रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 154 धावा केल्या होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना अंधेरी फक्त 146 धावाच करू शकली होती.त्यामुळे मराठा रॉयल्सने हा सामना 8 धावांनी जिंकून टी20 मुंबई लीगच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. खरं तर या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने प्रचंड मेहनत घेऊन टीमला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं होतं. पण कॅप्टन शिवम दुबेच्या चुकीमुळे अंधेरीने हातातोंडाशी आलेली ट्रॉफी गमावली आहे.
खरं तर मराठा रॉयल्सने दिलेल्या 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अंधेरीची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण मुशीर खान शुन्यावर आणि अर्जुन तेंडुलकर 2 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर प्रसाद पवार ही 9 धावांवर बाद झाला. एका बाजूने विकेट पडत असताना दिव्यांश सक्सेना चांगला डाव सावरून खेळत होता पण तो 51 धावांवर बाद झाला.
चार विकेट पडल्यानंतल प्रग्नेश कानपिलेवार आणि गौरव जठारने मॅच जिंकवायचा प्रयत्न केला पण दोघे 28 व 23 वर बाद झाले.त्यानंतर शिवम दुबे मैदानात आला त्याने मैदानावर टीकून खेळणे अपेक्षित होत पण तो देखील 15 वर बाद झाला.आणि तिकडेच अंधेरीने ही मॅच गमावली. तिथून फक्त अंधेरीला 24 धावा जिंकण्यासाठी हव्या होत्या.त्यामुळे अंधेरी जिंकू शकली असती पण शिवम दुबेच्या त्या चुकीमुळे ट्रॉफी गमावली.
अर्जुनच्या मेहनतीवर पाणी
मराठा रॉयल्सकडून प्रथम फलंदाजी करताना आर्यन पटनी आणि सचिन यादव मैदानात आला होता. यावेळी अंधेरीकडू अर्जुन तेंडुलकर प्रथम गोलंदाजीला आला होता. यावेळी अर्जुनच्या पहिल्याच ओव्हरला 12 धावा काढण्यात आल्या.त्यानंतर तिसरी ओव्हर टाकायला पु्न्हा अर्जुन आला होता. यावेळी अर्जुन तेंडुलकरने त्याच्या पहिल्याच बॉलवर सचिन यादवला 11 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले होते. त्यानंतर त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अर्जूनने अयाज खानला गौरव जठारच्या हातात कॅच आऊट केले होते.त्यामुळे अयाज 6 वर बाद झाला.अशाप्रकारे अर्जूनने हे दोन विकेट काढवून मॅच फिरवली होती.पण त्याची मेहनत वाया गेली.
Mumbai,Maharashtra
Jun 13, 2026 11:16 PM IST
