लावणी नृत्य हे महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखले जाते. गावा-खेड्यात जत्रेत मनोरंजन करण्यासाठी पिढ्या न पिढ्या लावणी सादर केली जाते. ही लोककला पाहण्यासाठी गावाच्या जत्रेत तुफान गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळते. पण लावणी सादर करणे हे सोपे नसते. लावणी करण्यासाठी नचत्याची जाण लागते त्याचबरोबर नृत्य सादर करण्याची कला, अदाही गरजेच्या असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लावणी सादर करणाऱ्या नृत्यांगनाने असे काही केले आहे जे पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नृत्यांगना लावणी सादर करताना दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा डीपनेक ब्लाऊज परिधान केला आहे. त्यावर आंबा कलरची नऊवारी साडी नेसली आहे. मोकळे केस, शोभेल असा मेकअपमध्ये नृत्यांगना सुंदर दिसत आहे. मात्र, तिने नृत्य सादर करताना जे काही अश्लील कृत्य केले आहे ते पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर कलाकार सुशांत सावंतने या नृत्यांगनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला नृत्यांगनाने जे काही अश्लील कृत्य केले आहे ते दाखवण्यात आले आहे. त्यानंतर त्याने स्वत:ची एक क्लिप व्हिडीओमध्ये वापरली आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला, एकीकडे लावणीच्या नावावर नंगानाच करायचा, ह्याला काही मर्यादा नाही असे लिहिले आहे. पुढे त्याने स्वत:लावणी सादर करतानाची क्लिप वापरली आहे. त्यावर आणि इथे माझ्यासारखे अनेक आहेत जे खरी लावणी जीवापाड जपत आहेत असे लिहिले आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
या कलाकाराने हा व्हिडीओ शेअर करत, शेवट पर्यंत नक्की बघा. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आपण नेहमी गप्प राहतो आणि ह्यांना हे करायला रान मोकळ मिळत. अश्या नंगानाच करण्याऱ्या प्रयकीला boycott करायला हवं असं कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.